शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रवेश आले निम्म्यावर

By admin | Published: July 17, 2017 12:08 AM

राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणात कार्यरत तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत.

विद्यार्थ्यांना ओहोटी : महाविद्यालये पडताहेत ओसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणात कार्यरत तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत. यंदा अमरावती विभागात तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशाची नोंदणी निम्म्यावर आल्याने भविष्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती वर्तविली जात आहे.तंत्रशिक्षण मंडळाच्या नवीन नियमांमुळे आयटीआय, एमसीव्हीसी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येतो. मात्र तंत्रनिकेतन प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी अल्प असल्याने तंत्रशिक्षण विभागही चक्रावून गेला आहे. अमरावती विभागात तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ३१ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी ९ हजार २१० इतकी प्रवेशक्षमता आहे. मात्र १० जुलैपर्यंत तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशासाठी ४ हजार २४० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात करियर घडवू इच्छिणाऱ्यांची संख्या रोडावत चालल्याचे हे द्योतक आहे. अभियांत्रिकी प्रवेशाची स्थितीदेखील फारशी वेगळी नाही. काही संस्थाचालकांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी अक्षरश: विद्यार्थी शोधून आणावे लागत आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरी काही अभियांत्रिकी महाविद्यालयांचे रेकॉर्ड बघूनच पालक त्यांच्या पाल्यांना प्रवेश देत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रवेशासाठी रांगा लागायच्या. मात्र, आता चित्र बदलले असून तंत्रनिकेतन महाविद्यालये प्रवेशाअभावी ओस पडू लागली आहेत.