शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत

By admin | Published: September 10, 2015 12:03 AM

साहिल डायरे या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर माहुली (जहांगिर) येथे निर्माण झालेल्या स्थितीनंतर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या धसक्यामुळे अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत झाले आहेत.

अमरावती : साहिल डायरे या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर माहुली (जहांगिर) येथे निर्माण झालेल्या स्थितीनंतर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या धसक्यामुळे अर्धेअधिक माहुलीवासी भूमिगत झाले आहेत. गावात उरलेल्या काही मोजक्या गावकऱ्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून आणखी काही गावकऱ्यांना अटक करण्यात येणार आहे. माहुली येथे २५ आॅगस्ट रोजी साहिल गजानन डायरे या चिमुकल्याचा एसटी खाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी एसटीसह एका अग्निशमन दलाच्या वाहनाची जाळपोळ केली. तर पोलिसांनाही मारहाण केली. जाळपोळीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करून गावकऱ्यांवर छऱ्याच्या बंदुकी चालविल्या. घटनेच्या तब्बल १४ दिवसांनंतर पोलिसांनी सोमवारपासून दोषी गावकऱ्यांना अटक करणे सुरु केले आहे. जाळपोळ व लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी रवी पेठेकर, योगेश यावस्कर, मार्कंड सुरडकर, छत्रपती गणपत सपकाळ यांना अटक केली आहे. माहुलीत स्मशान शांतताअमरावती : माहुली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी पोलिसांनी उपसंरपच अब्दुल अन्सार अब्दुल जब्बार व शिरीष टवलारे यांना अटक केली आहे. त्यापैकी रवी, योगेश, मार्कंड व छत्रपती यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तर उपसंरपंच अब्दुल अन्सार व शिरीष टवलारे यांना जामीन मंजूर केला आहे. माहुली पोलीस ठाण्यावर मोर्चा नेणाऱ्यांपैकी गजानन भोनेला ८ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली असून त्याला जामीन मिळाला आहे. पोलिसांनी अटकेची मोहीम सुरु केल्याने सर्वच गावकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्यामुळे दोषी गावकऱ्यांसह अर्धेअधिक गावकरी गाव सोडून गेले आहेत. परिणामी माहुली येथे स्मशानशांतता पसरली आहे. निरपराधांवर पोलिसांचा अन्यायगावातील तणाव शांत करण्याकरिता गेलेले सरपंच संजय नागोसे व प्रवीण मनोहरे यांच्यावर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सरपंच सकाळी ८.५१ वाजताच्या सुमारास टोलनाक्यावर असल्याची नोंद आहे. मात्र, पोलिसांनी सकाळी ७ वाजता घडलेल्या घटनेमध्ये सरपंचावर गंभीर गुन्हे नोंदविले. हा त्यांच्यावर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.