शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

हलकल्लोळ, विलाप अन् संतापही!

By admin | Published: July 05, 2014 11:18 PM

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चिमुकल्यांचे मृतदेह. जखमी अवस्थेत विव्हळणारे आप्त आणि या आप्तांची अवस्था बघून भांबावलेल्या इतर स्वजनांनी सुरू केलेला केविलवाणा आक्रोश.

बडनेऱ्यात वाहनाने चिरडले : भटकंतीच्या आयुष्यात मृत्यू करतो पाठलाग श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरारस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चिमुकल्यांचे मृतदेह. जखमी अवस्थेत विव्हळणारे आप्त आणि या आप्तांची अवस्था बघून भांबावलेल्या इतर स्वजनांनी सुरू केलेला केविलवाणा आक्रोश. असे हृदयाला पीळ पाडणारे विदारक चित्र शनिवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान बडनेरा महापालिका कार्यालयानजीक दिसून आले. बेधुंद झायलो वाहनाने चिरडल्यानंतर मदतीसाठी चहुकडे धावणारे पारधी समुदायाचे नागरिक आणि महिलांचा हलकल्लोळ पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे उभे राहिले. दरम्यान, घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस ताफा पोहोचला. लगेच १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केले. जखमींमध्ये लहान मुले, मुली, महिलांचा समावेश आहे. पारधी बांधवांची वाहनचालकाला मारहाणनिद्रिस्त अवस्थेतील पारधी समुदायाला भरधाव वाहनाने चिरडून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला झायलो चालक अमर राठोड व त्याचा साथीदार विनोद दुबे यांना पारधी बांधवांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर वाहनाची तोडफोडही केली. यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी पोहोचले पोलीस आयुक्तघटनास्थळी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, उपनिरीक्षक पी.पी. घावडे उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी अपघात स्थळाचे अवलोकन करून कारणांची मीमांसा केली.