शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

शिवकुमारला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:31 PM

मुलीला त्रास देणाऱ्या शिवकुमारला फाशी द्या, अन्यथा मला फाशी द्या, असा आक्रोश मृत दीपाली चव्हाण यांच्या आईने केला. त्या  इर्विन रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात दुपारी आल्या होत्या. मोठी मुलगी वैशालीला पकडून ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यांनी दीपालीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडला. आईची अशी अवस्था बघून नातेवाईकांनाही अश्रृ अनावर झाले. दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा मला फाशी द्यावी, असा आक्रोश दीपालीच्या वृद्ध आईने केला.

ठळक मुद्देदीपालीच्या आईची मागणी, जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे

अमरावती : मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ अशी ओळख असलेल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांना शुक्रवारी पाऊणे नऊ वाजता साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. दीपाली यांचे सासर असलेल्या छोट्याशा मोरगावात पती राजेश माेहिते यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. जंगलाचे संरक्षण व वन्यजीवांचे रक्षण करणारी दीपाली नावाची वाघीण गोळ्या झाडून आत्महत्या करेल, यावर कुणालाही विश्वास बसला नाही. दीपाली यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्या शिवकुमार याला फाशी द्या, अशी मागणी त्यांच्या आईने एसपींकडे रेटून धरली होती. दीपालीच्या न्यायासाठी भाजप आणि बेलदार समाज एकवटला. मृत दीपाली यांची आई, बहीण, नणंद आणि पती हे एकमेकांना सावरताना दीपालीच्या आठवणींना उजाळा देत होते. दीपाली यांना अखेरचा निरोप दिल्यानंतरही ‘ती’ आत्महत्या करेल, याविषयी माेरगाववासी नि:शब्द झालेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुलीला त्रास देणाऱ्या शिवकुमारला फाशी द्या, अन्यथा मला फाशी द्या, असा आक्रोश मृत दीपाली चव्हाण यांच्या आईने केला. त्या  इर्विन रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात दुपारी आल्या होत्या. मोठी मुलगी वैशालीला पकडून ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यांनी दीपालीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडला. आईची अशी अवस्था बघून नातेवाईकांनाही अश्रृ अनावर झाले. दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा मला फाशी द्यावी, असा आक्रोश दीपालीच्या वृद्ध आईने केला. वैशाली पवार(सातारा) व आत्या सुनंदा चव्हाण (पुणे) याही गहिवरल्या. 

एसपींची एंट्री व नातेवाईकांचा घेरावाप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची एंट्री होताच मृताच्या नावतेवाईकांनी व महाराष्ट्र राज्य बेलदार भटक्या समाज बांधवांनी एसपींना घेराव घालत शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना निलंबित करून त्यांनाही सहआरोपी करा, गुन्हा नोंदवून अटकेची मागणी केली. एसपींनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. कायदेशीर कारवाई करू, असे सांगत शवविच्छेदन केंद्रात मृतदेहाची पाहणी करून माहिती घेतली.  

गर्भवती असतानाही दिली जोखमीची कामेमे महिन्यात लॉकडाऊनमध्ये मी बहिण दिपालीकडे  काही दिवस राहली. तिचे वरीष्ठ अधिकारी शिवकुमार हे तिला नेहमीच त्रास द्यायचे तातडीने कॅम्पला पाठवून तेथून सेल्फी पाठविण्याचे आदेश देत होते. ती गर्भवती असतानाही तिला सतत जोखमीची कामे दिल्या जात होती त्यादरम्यान तिला धावपड करण्यास भाग पाडल्यामुळे तिला गर्भपात करावा लागला.  त्यामुळे तिच्या पोटातील जीवाचाही बळी गेला. याला सुद्धा कारणीभुत शिवकुमार हा असल्याचा आरोप यावेळी मृताची बहीण वैशाली पवार यांनी केला. तसेच शिवकुमारला पाठीशी घालणारे वरीष्ठ अधिकारी रेड्डींवर  कारवाई करावी. असे त्या म्हणाल्या. 

वडील, भावाचाही मृत्यूदीपाली अभ्यासात हुशार होती. घरात सर्वात शिक्षित असल्याने अधिकारी होण्याचे स्वप्ने तिने पूर्ण केले. मात्र, १० वर्षांपूर्वी वडिलांचा, तर त्यानंतर सहा महिन्यांनी धाकट्या भावाचाही मृत्यू झाला. त्यामुळे आई या दीपाली यांच्याकडे हरिसाल येथे राहत होत्या. दीड वर्षांपूर्वी दीपालीचे कोषागार कार्यालयात कार्यरत असलेल्या राजेश मोहिते यांच्याशी लग्न झाले, अशी माहिती त्यांची मोठी बहिणी वैशाली यांनी दिली. 

 

टॅग्स :forest departmentवनविभाग