विनेश बेलसरे मंगरुळ चव्हाळानांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे हनुमान जयंतीनिमित्त यंदाही हनुमानभक्ताने एक नव्हे, तर तब्बल ११ बंड्या ओढल्या. हा कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंगरुळ येथे हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन २८ ते ४ एप्रिलदरम्यान करण्यात आले. सदाशिव महाराज यांच्या कंबरेला दोर बांधून त्यावरील आकोड्याच्या साहाय्याने ११ गाडे ओढले. हा कार्यक्रम ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पार पडला. गावाच्या एका टोकापासून हनुमान मंदिरापर्यंत गाडे ओढण्यात येते. अद्यापही ही परंपरा एकाच व्यक्तीने जोपासली आहे. बंड्या एकमेकांना बांधून त्यावर शेकडो हनुमान भक्त सवार होतात. बंड्या ओढण्यापूर्वी खंडारे महाराजांना मंदिरात एकांतात बसवतात. पूजा करुन त्यांना बंड्याजवळ नेले जाते. त्यानंतर ते ११ बंड्या स्वत: ओढतात.
हनुमानभक्ताने ओढल्या ११ बंड्या!
By admin | Published: April 06, 2015 12:28 AM