अमरावती : एका पुरुष व महिला आरोपीने महिलेस मारहाण करून पुरुष आरोपीने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाणे हद्दीतील साईनगर परिसरात शुक्रवारी घडली.
प्रभाकर सरोदे, एक महिला दोन्ही (रा. साईनगर) आरोपी असून ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून भादंविची कलम ३५४(अ) ५०६(ब), ५०४,३४ अन्यवे गुन्हा नोंदविला आहे. पोलीस सूत्रानुसार फिर्यादी महिला ही तिची बहीण व विहिणीसोबत वडिलांना पाहण्याकरिता आरोपी महिलेच्या घरी गेली. तिने माझे वडील कुठे आहेत असे विचारले? या कारणावरून महिलेने वाद करून फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताबुक्क्याने मारहाण केली. पुरुष आरोपीने मारहाण करून महिलेचे कपडे फाडून लोटलाट करून विनयभंग केला. त्यानंतर महिला आरोपीने फिर्यादीच्या बहीण व वहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी पुरुष आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.