फोटो कोविड लसीचा फोटो टाकणे
पान २ ची लिड
चांदूर बाजार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र लसीकरणाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बुकिंग करणे आवश्यक आहे. अशात लसीकरण हे तालुक्यातील ग्रामीण भागात होत असले तरी याचा फायदा केवळ शहरी भागातील नागरिकांना होत आहे. यात तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ग्रामीण नागरिकांची नोंदणी करण्याच्या जनजागृतीबाबत अनास्था दाखवीत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सातत्याने वाढत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी जी लिंक दिली, ती महत्प्रयासाने उघडलीच, तर त्यावर लसीकरण केंद्राची यादीच येत नाही. ना यादी, ना तारीख.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता शासनाने तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनासुद्धा १ मे पासून लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यात मात्र प्रत्यक्षात शिराजगाव बंड येथे ६ मे पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, यासाठी आरोग्य सेतू व कोविन या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता आरोग्य प्रशासनाने कोणतीही जनजागृती, अथवा नागरिकांना सूचना न देता ५ मे रोजी रात्री १० वाजता दरम्यान, ७ मे रोजी सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान, ८ मे रोजी सकाळी ९ ते साडेनऊच्या दरम्यान या वेगवेगळ्या वेळेत लसीकरणासाठी बुकिंग करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे तालुक्यातील आरोग्य विभागाने शिरजगाव बंड केंद्रावर लसीकरणाच्या बुकिंगबाबत कोणतीही जनजागृती केली नाही. अचानक ५ मे रोजी रात्री १० वाजता लसीकरण बुकिंगला सुरुवात झाली. ऑनलाईन बुकिंग सुरू होताच क्षणात बुकिंग फुल्ल झाले. यात ६ मे रोजी ८० नागरिकांनी लसीकरण केले. यातील बहुतांश नागरिक तालुक्याबाहेरील होते. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतून बुकिंग सुरू झाल्याची माहिती त्यांचाच जवळच्या लोकांसाठी लिंक झाली असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.
दररोज बुकिंगची वेळ बदलत असल्याने तालुक्यातील नागरिक लसीकरणाच्या बुकिंगसाठी त्या वेबसाइटवर चातकाप्रमाणे बुकिंग सुरू होण्याची वाट बघत होते. सध्या कोरोना हा ग्रामीण भागात हाताबाहेर जात असल्याची स्थिती दिसून येत आहे. शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, प्रल्हादपूर, विश्रोळी ही गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याअनुषंगाने शिरजगाव बंड येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी एकमेव लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
बॉक़ञ‘
शहरवासीयांचा भरणा
लसीकरण केंद्र जरी शिरजगाव बंडच्या नावावर असले तरी या केंद्रावर शहरी भागातील नागरिकांचा शिरकाव अधिक दिसत आहे. लसीकरणाचा बुकिंगबाबत तालुका आरोग्य यंत्रणा तालुक्यात हेतुपुरस्सर जनजागृती करीत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक असताना ग्रामीण भागातील केंद्रावर शहरी नागरिक लस टोचून घेत असल्याने ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट
लसीकरण बुकिंग ५ तारखेला रात्री सुरू झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मे पासून एकच वेळ जाहीर केली आहे. शहरी भागात आधीच लसीकरण सुरू झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे.
- ज्योत्सना भगत, तालुका आरोग्य अधिकारी