शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महिमापूरच्या ऐतिहासिक पायविहिरीला दिली का कधी भेट? विहिरीचा होणार 'मेकओव्हर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:03 IST

Amravati : पोस्ट कार्डवर झळकली होती विहीर

प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. या सुंदर पायविहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये २ कोटी ८८ लाख ८१ हजार ५१० रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी ९३.२७ लाख रुपयांचा निधी २७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. या निधीतून त्या ऐतिहासिक पायविहिरीचा मेकओव्हर होणार आहे.

महिमापूरस्थित पायऱ्यांची विहीर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या २ कोटी ८८ लाख ८१ हजार ५१० रुपये इतक्या रकमेच्याअंदाजपत्रकास सन २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ते काम तुमसर येथील एका कंत्राटदाराने २.६७ कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. त्या कामास सुरुवात झाली असून, २७ फेब्रुवारी रोजी एकूण खर्चापैकी ९३.२७ लाख रुपयांच्या प्रथम देयकासदेखील मान्यता देण्यात आली आहे. या ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्तीची कामे ही विशिष्ट प्रकारची असून, ती कामे पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार करणे आवश्यक आहे.

पोस्ट कार्डवर झळकली होती विहीरराष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून केंद्रीय टपाल विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये या विहिरीचे छायाचित्र पोस्ट कार्डवर झळकल्याने ही पायविहीर राष्ट्रीय नकाशावर आली आहे. तथापि, जिल्ह्याचे वैभव असलेली ही विहीर दुर्लक्षितच होती. पुरातत्त्व विभागाच्या लेखी राज्य संरक्षित स्मारक म्हणून या विहिरीची नोंद असली तरी विहिरीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते; मात्र आता सुमारे २.८८ कोटींमधून विहिरीचे जतन केले जाणार आहे.

अशी आहे रचना

  • अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर हे गाव आहे. याच गावात ही ऐतिहासिक विहीर आहे.
  • संपूर्ण दगडाचे बांधकाम. चौकोनी आकार. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या.
  • पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था.

अमरावती जिल्ह्याच्या 'गॅझेटियर'मध्ये नोंदविहिरीचे आतील बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना, आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती, अशी या विहिरीची रचना आहे. ही विहीर मुघलकालीन असल्याचा उल्लेख अमरावती जिल्ह्याच्या 'गॅझेटियर'मध्ये आहे. जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीDaryapurदर्यापूर