ओळख पटली : हत्या की आत्महत्या ?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारातील केशवराव भोसले सभागृहामागिल विहिरीत आढळलेला मृतदेह हा बडनेरा येथील प्रतीक्षा महावीर रामटेके (१७, रा. अशोक नगर) या तरुणीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाडगेनगर पोलिसांनी चौकशी करून नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर तिची ओळख पटली आहे. मात्र, प्रतिक्षाची हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे. सोमवारी सायंकाळी केशवराव भोसले सभागृहामागील विहिरीत तरुणीचा मृतदेह तरगंताना आढळून आला. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणीच्या उजव्या हातावर इंग्रजीत "ए" व आकाश असे लिहिले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरु केली. दरम्यान सायंकाळी बडनेरा पोलीस ठाण्यात प्रतीक्षा रामटेके हरविल्याची तक्रार करण्यासाठी नातेवाईक पोहोचले होते. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांनी बडनेरा पोलिसांशी सपर्क केल्यानंतर नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. बुधवारी प्रतिक्षाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये प्रतिक्षाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रतीक्षा रामटेके वडील आईपासून विभक्त राहत असून ती आईसोबत बहिणीच्या घरी राहत होती. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून ती बहिणीसोबत एका वसतीगृहातील खानावळीत काम करत होती. तिचा भाऊ इंदोर शहरात काम करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर यांनी दिली.प्रतीक्षाजवळील मोबाईल गेला कुठेप्रतीक्षा रामटेके ही तीन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडली. तीने तिचा मोबाईल शेजारच्या महिलेजवळ ठेऊन त्या महिलेचा मोबाईल सोबत घेतला. सद्यस्थितीत तो मोबाईल बंद असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले आहे.
‘तो’ मृतदेह बडनेऱ्यातील प्रतीक्षाचा
By admin | Published: May 25, 2017 12:09 AM