शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मृत्यूच्या दाढेतून तो परतला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:46 PM

स्त्यालगत शौचास बसलेल्या चिमुकल्याने आईचा हात झटकून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तो भरधाव एसटीखाली आला.

ठळक मुद्देएसटीखाली आल्याने जखमी : जसापूरजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यालगत शौचास बसलेल्या चिमुकल्याने आईचा हात झटकून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तो भरधाव एसटीखाली आला. चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने तो चिमुकला मागील चाकाखाली येण्याआधीच एसटी थांबली. अंगावर शहारे आणणारी ही घटना सोमवारी लोणी ठाण्याच्या हद्दीतील जसापूर येथे घडली.साडेतीन वर्षाचा उत्कर्ष अमोल मुंदे (रा. जसापूर) हा आई व मोठ्या भावासोबत सकाळी १० वाजता बस थांब्यावर आला होता. उत्कर्षला शौचास लागल्यामुळे आईने त्याला अमरावती-यवतमाळ मार्गाच्या कडेला बसविले. मात्र, शौचास बसलेल्या उत्कर्षने अचानक आईचा हात झटकून वाहतुकीच्या रस्त्यावर पळ काढला. त्याला पकडण्यासाठी आईने प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत रस्त्याच्या मधोमध तो गेला होता. एमएच ४० एन-८६७८ क्रमांकाची दारव्हा-अमरावती भरधाव एसटी यावेळी आली. प्रसंगावधान राखून चालकाने एअरब्रेक करकचून दाबले. मात्र, उत्कर्ष एसटीच्या खाली आलाच. एसटी थांबताच उत्कर्ष मागील चाकापुढे आढळला. इकडे मुलगा एसटीखाली आल्याचे पाहून त्याच्या आईने एकच आक्रोश केला. तिने धाव घेत उत्कर्षला चाकाजवळून काढले. किरकोळ जखमी झालेला उत्कर्ष भेदरल्यामुळे बोलत नव्हता. आईचा आकांत पाहून लगेच चालक एस.एम. पुरी व वाहक ए.पी. बन यांनी दोघा मायलेकांना एसटीत बसवून बडनेरा डेपो गाठले. बसमधील प्रवाशांना तेथेच उतरवून उत्कर्षला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. उत्कर्षच्या डोक्याला व पायाला किरकोळ जखमाच असल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी चालकाने उत्कर्षला तत्काळ उपचारासाठी आणून माणुसकीचे दर्शन घडविले.