शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

जनतेने निवडून दिले अन् पायउतार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:17 AM

०६एएमपीच०२ - मतमोजणी करताना अधिकारी. ०६एएमपीएच०३ - मतदानासाठी उपस्थित ग्रामस्थ. ०६एएमपीएच०३ - पायउतार सरपंच नाना बेठेकर. ०६एएमपीएच०४ - मतदानासाठी ...

०६एएमपीच०२ - मतमोजणी करताना अधिकारी.

०६एएमपीएच०३ - मतदानासाठी उपस्थित ग्रामस्थ.

०६एएमपीएच०३ - पायउतार सरपंच नाना बेठेकर.

०६एएमपीएच०४ - मतदानासाठी उपस्थित महिला ग्रामस्थ.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

गांगरखेड्याच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास पारित, अमरावती जिल्ह्यातील पहिलीच घटना

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : चार वर्षांपूर्वी थेट जनतेने निवडून दिलेले सरपंच नाना बुचा बेठेकर यांना जनतेनेच मतदान करून पायउतार केले. तालुक्यातील गांगरखेडा येथे सोमवारी पोळ्याच्या दिवशी लोकशाहीची ही अद्भुत किमया घडली. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

गांगरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ३ डिसेंबर २०१७ रोजी थेट जनतेतून नाना बेठेकर यांची निवड झाली होती. ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्याकडून स्वमर्जीने व सदस्यांना विश्वासात न घेता चालविला जात तसेच विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत उपसरपंच प्रमोद मोरले, सदस्य मंगल मोरले, रामप्रसाद भुसुम, कापली काकडे, फुलकई मोरकर, मंगरू कासदेकर, गीता बिलवे, पूनम आठवले, लता रेचे या एकूण नऊ सदस्यांनी सरपंच नाना बेठेकरविरुद्ध अविश्वास प्रस्ताव तहसीलदार माया माने यांच्याकडे सादर केला होता. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाला तो पाठविण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात झालेल्या मतदानात सरपंच नाना बेठेकर पायउतार झाले. निवडणुकीचे काम गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके, शैलेश पालन, बंडू घुगे, रमेश मसराम, शुभम ठाकरे आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके व संजय तायडे, करुणा काळे, शिंगणे व पोलीस कर्मचारी हजर होते.

बॉक्स

२६१ मतदारांचा सहभाग, सरपंचाला ४९ मते

गांगरखेडा व तोरणवाडी या गावांची गटग्रामपंचायत आहे. सुमारे दीड हजार मतदार आहेत. तथापि, सोमवारी विशेष सभेच्या आयोजनानंतर जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत घेतलेल्या मतदानात २६१ ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गणपूर्ती झाल्याने मतगनणा करण्यात आली. त्यामध्ये १४ मते अवैध, ४९ मते सरपंच नाना बेठेकर यांना, तर १६८ मते विरोधात पडली.

बॉक्स

जनतेने बसविले अन उतरविलेही

थेट जनतेतून निवडलेले सरपंच सदस्यांचे ऐकत असल्याचा प्रकार अनेक ग्रामपंचायतींमध्ये पुढे आला आहे. त्यापैकी गांगरखेडा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचासह नऊ सदस्यांनी अविश्वास अविश्वास प्रस्ताव सादर केला व कंटाळलेल्या जनतेनेच सरपंचाला मतदानाने पायउतार केले.