जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागेल त्याला स्वस्त तूर डाळ देण्यात येणार आहे. रेशन कार्डावर प्रतिकिलो ५५ रुपये याप्रमाणे या डाळींचे वितरण करण्यात येणार आहे. सध्याच्या बाजारभावापेक्षा हा दर ५ ते १३ रुपये कमी आहे. जिल्हा पुरवठा विभागाने १७५० क्विंटल तूर डाळीची मागणी केली आहे.राज्य शासनाने २८ नोव्हेंबर २०१७ पासून रेशनवर तूर डाळ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही तूर डाळ केवळ अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना प्रतिकार्ड एक किलो दिली जात होती. यावर्षी राज्य शासनाने मागेल त्याला तूर डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कार्डधारकांना रेशनवर तूर डाळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रतिकार्ड एक किलोऐवजी मागणी केल्यास त्यापेक्षा अधिक तूर डाळ दिली जाणार आहे. तूर डाळीची विक्री वाढावी, याकरिता रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी तूर डाळ पॉस मशीनद्वारे विक्री केल्यास १ रुपये ५० पैसे, तर विना पॉस विक्री केल्यास प्रतिकिलो ७० पैसे कमिशन दिले जात होते. या कमिशनमध्ये वाढ केली असून, प्रतिकिलो रेशन दुकानदारांना तब्बल तीन रुपये कमिशन मिळणार आहे.जिल्ह्यात २१९८ क्विंटल तूर डाळीचे वितरणजानेवारी ते १४ मेपर्यंत जिल्ह्यात २१९८.९५ क्विंटल तूर डाळ वितरित करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या नियोजनामुळे कमी कमिशन असूनही रेशन कार्डधारकांना तूर डाळ विक्री करण्यात आली. यावषीर्ही मोठ्या प्रमाणात तूर डाळ विकली होईल, असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला. दुकानदारांकडून जशी मागणी वाढेल त्या पद्धतीने तूर डाळ उपलब्ध करून देण्याचेही सध्या नियोजन सुरू आहे.रेशनवर उपलब्ध करून देण्यात येणारी तूर डाळ चांगल्या प्रतीची आहे. काहीही न मिळणाऱ्या शुभ्र केशरी कार्डधारकांनाही ही तूर डाळ उपलब्ध होणार आहे.- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी
मागेल त्याला स्वस्त तूर डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:16 PM