लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : परिसरातील १५ गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. बँक व परिसरातील गावांची बाजारपेठ आसेगाव असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचा येथे राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागाशिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. किरकोळ स्वरूपाच्या रूग्णांनासुद्धा थेट जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.दुपारच्या सत्रात रुग्ण तपासणीसाठी गेला असता, वैद्यकीय अधिकारी येण्यास टाळतात. तपासणी न करताच त्यांची गोळ्या देऊन बोळवण केली जाते. अनेक रुग्णांना तर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट पाहावी लागते. अशा स्थितीमुळे अनेकदा वाद निर्माण होतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी आरोग्य नव्हे, अनास्था केंद्र बनले असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सल्लागार समिती कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीकडे मुद्दामच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी कुठलीच सोय नाही. संबंधितास तहसील वा अमरावतीला विशिष्ट कारण दाखवून जाण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे येथील रूग्णालयाच्या आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.महालॅब बनली शोभेची वस्तूयेथील महालॅब प्रतिनिधी रुग्णाचे रक्ताचे नमुने घेतात. मात्र, त्या रक्ताच्या नमुन्याचे रिपोर्ट मिळत नसल्याचे बराचशा रुग्णांच्या तक्रारी आहे तसेच याबाबतचे त्याच्याकडे दस्तावेजसुद्धा नसल्याचे समजते. यामुळे येथील महालॅब (रक्त तपासणी) ही शोभेची वस्तू झाली आहे.आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मध्यंतरी महालॅबमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याच्या नातलगाची तब्येत बरोबर नसल्यामुळे अनुपस्थित असल्याचे आणि आरोग्य केंद्रातील औषधसाठा पूर्ण असल्याचे सांगितले.- डॉ. समीना खानवैद्यकीय अधिकारीवरिष्ठांशी चर्चा करून रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करू. आरोग्याविषयी कोणाची तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधितांशी असलेल्या तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.- श्याम मसरामजि. प. सदस्य तथा अध्यक्ष आरोग्य समिती
आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:29 PM
परिसरातील १५ गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. बँक व परिसरातील गावांची बाजारपेठ आसेगाव असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचा येथे राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागाशिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत.
ठळक मुद्देआसेगावात रूग्णांचे हाल : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप