शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आरोग्य कार्यालय की भंगारखाना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:24 PM

येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची दुरवस्था पाहता, हे आरोग्य यंत्रणेचे कार्यालय की भंगारखाना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘अ’ श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्याची पदस्थापना असलेल्या कार्यालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय परिसर बकाल आणि अस्वच्छ बनला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले हे कार्यालयच आजारी असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

ठळक मुद्देदुरवस्था : नूतन इमारतीचा प्रस्ताव धूळखात; लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची दुरवस्था पाहता, हे आरोग्य यंत्रणेचे कार्यालय की भंगारखाना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘अ’ श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्याची पदस्थापना असलेल्या कार्यालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालय परिसर बकाल आणि अस्वच्छ बनला आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले हे कार्यालयच आजारी असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.सुमारे १० वर्षांपूर्वी तालुकास्थळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची निर्मिती झाली. त्यावेळी हे कार्यालय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासाच्या एका खोलीत थाटले होते. त्यावेळी फक्त चार ते पाच कर्मचारी कार्यरत होते. त्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयात क्षयरोग प्रतिबंधकची दोन, सिकलसेल सहाय्यक, आशा तालुका समूह संघटक व कुष्ठरोग प्रतिबंधक प्रत्येकी एक अशा एकूण पाच पदांची भर पडली. दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय एका शिकस्त अशा वसतिगृहात हलविण्यात आले. तेव्हापासून एका खोलीत बैठक घेण्यापुरती जागा व एका खोलीत कार्यालय अशा स्थितीत या कार्यालयातील कारभार हाकणे सुरू आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंदे्र व सात उपकेंद्रे आहेत. त्यावर तालुका आरोग्य कार्यालयाचे नियंत्रण आहे. मात्र, खुद्द ‘टीएमओ’मध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाºयांनी ही दुरवस्था व त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली.इमारत बांधकामाचा निधी परततालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दहा वर्षांपूर्वी स्थापन झाले. तेव्हापासून कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी वारंवार प्रस्ताव टाकण्यात आले. सन २०११-१२ मध्ये नूतन इमारत उभारणीसाठी निधी प्राप्त झाला. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे तो अखर्चित राहून परत गेला.सात वर्षांपूर्वी आलेले अनुदान खर्च न झाल्याने परत गेले. त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठांच्या प्रत्येक बैठकीत इमारतीसाठी निधीची मागणी केली जात आहे. प्रस्ताव देण्यात आला आहे.- डॉ. एम.आर. जयस्वालतालुका आरोग्य अधिकारी चांदूर रेल्वे.राष्टÑीय आरोग्य अभियान अस्तित्वात आल्यापासून तालुका आरोग्य केंद्राच्या कार्यालयाची अशी दुर्दशा झाली आहे. समितीच्या बैठकीत वारंवार चर्चा केली जाते; मात्र निधी मिळालेला नाही.- सोमेश्वर चांदूरकरसमन्वयक, राष्टÑीय आरोग्य देखरेख अभियान समिती