लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले व अन्य तिघांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी मंगळवारी रस्त्यावर उतरले. सर्व गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास २२ मार्चपासून आरोग्य यंत्रणा काम बंद आंदोलन पुकारेल, असा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी व परिचारिकांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीषा सूर्यवंशी, डॉ. प्रतिभा बोरखडे, डॉ. हेमंत महाजन, डॉ. अमोल देशमुख, डॉ. मिलिंद गवई, डॉ. ज्योत्ना पोटपिटे, राजेंद्र रहाटे, अमोल वारकरी, प्रफुल्ल रिधोरे, देवेंद्र शिंदे, मनीष हटवार, तारकेश्वर घोटेकर, एम.पी. अभ्यंकर, एस.ए. मुंडे, ए.एच. राऊत, जी.के. सुने, एल.सी जोशी, उमेश उपरीकर, कविता पवार, पी.एन. आगरकर, गायत्री लासुरे, सुवर्णा सोळंके, सुषमा सुने, लक्ष्मी खंडारे आदी यावेळी उपस्थित होते. प्रकरणाने आरोग्य विभाग ढवळून निघाला असून, सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.‘त्या’ महिलेविरुद्ध आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालयावर पेट्रोलची बॉटल घेऊन पोहोचलेल्या महिलेविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी रात्री आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. विनयभंग प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन ती पीडित महिला पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिच्याजवळ पेट्रोलने भरलेली बॉटल आढळून आली होती.ठाणेदारांवर आक्षेपचांदूर बाजारचे ठाणेदार उदयसिंह साळुंके यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी वा शहानिशा न करता ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांविरुद्ध अजामिनपात्र गुन्हे दाखल केले. हा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय आहे. चौकशी करून गुन्हे दाखल करणे अनिवार्य असल्याचे मत डीएचओंच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.
डीएचओंच्या समर्थनार्थ सरसावले आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:10 PM
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले व अन्य तिघांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी मंगळवारी रस्त्यावर उतरले. सर्व गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास २२ मार्चपासून आरोग्य यंत्रणा काम बंद आंदोलन पुकारेल, असा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी व परिचारिकांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ठळक मुद्देप्रकरण विनयभंगाच्या आरोपाचे : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंना निवेदन