हवामान कोरडे : तुरळक पावसाची शक्यताअमरावती : पावसाळा संपल्यानंतर ‘आॅक्टोबर हीट’चा फटका नागरिकांना सहन करावा लागला. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आता हवामान कोरडे राहणार आहे. रात्री हळूहळू थंडी वाढू लागली असून नागरिकांना लवकरच गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, अरबी समुद्रात सक्रिय चपळा वादळ थोडे उत्तर-पश्चिमेकडे सरकले आहे. हे वादळ सध्या मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण अरबी समुद्रात स्थिरावले आहे. मुंबईपासून अंदाजे १ हजार किमी अंतरावर हे वादळ असून ओमान आणि येमेनच्या दिशेने सरकून तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या वादळाचे रुपांतर चक्रिवादळ होणार असून ओमानला धडकण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तरप्रदेशावर ३.१ किमी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असून तेथेच कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. श्रीलंका आणि भोवताल ४.१ किमी उंचीवर चक्राकार वारे आणि सभोवताल १.५ किमी चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे हवामान कोरडे राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान १८ ते २० ड्रिगी सेल्सिअस तर दिवसाचे ३० ते ३२ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आता हळूहळू दिवसांचे व रात्रीच्या तापमानात घट होणार असून थंडीचा प्रभाव वाढणार आहे. (प्रतिनिधी)
आॅक्टोबर हीट संपला आता थंडीची चाहूल
By admin | Published: November 04, 2015 12:14 AM