अमरावती : सध्या वायव्य मध्य प्रदेशच्या १५०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. असनी तीव्र चक्रीवादळ पोर्टब्लेयरच्या ७०० किमी वायव्येस आहे व १० ला वायव्य दिशेने मार्गक्रमण करीत आंध्र प्रदेश, ओरिसा किनारपट्टीजवळ पोहचेल. त्यानंतर मार्ग बदलून ईशान्य दिशेने मार्गक्रमण करण्याची व पुढील दोन दिवसांत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे चार ते पाच दिवस जिल्ह्यासह विदर्भात पावसाची शक्यता कमी व वातावरण अंशतः ढगाळ राहील. त्यानंतर ११ ते १३ मे दरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.