पावसाने ओलांडली सरासरी : वरुड तालुक्यात सर्वाधिक ५६.८ मि.मी. पाऊ सगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत मान्सूनचा पाऊस पडला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात २१ जूनपर्यंत ४२.४ मि.मी पाऊ स अधिक पडला आहे. जिल्ह्यात २० व २१ जून रोजी सर्वाधिक पाऊ स वरुड तालुक्यात पडला तर शनिवारी ५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. मान्सूनच्या दमदार आगमनानंतर खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. जिल्ह्यात १ ते २१ जूनदरम्यान पावसाची अपेक्षित सरासरी १०२.२ मि.मी. असताना १४४.६ मि.मी पाऊ स पडला आहे. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची सरासरी १४१.५ मि.मी आहे. ही सरासरी वार्षिक पावसाच्या तुलनेत १७.८ टक्के आहे. २१ जून रोजी जिल्ह्यात सरासरी २४.२ मि.मी. पावसाची नोंद झाली यामध्ये ५६.८ मि.मी पाऊ स वरुड तालुक्यात पडला आहे. चिखलदरा तालुक्यात ४२.४ मि.मी.,अमरावती ४१.५मि.मी., तिवसा तालुका ५१.९ व सर्वात कमी ६.८ मि.मी.पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला आहे. १ ते २१ जून दरम्यान जिल्ह्यात १४४.६ मि.मी. पाऊ स पडला. यामध्ये सर्वाधिक २४५.२ मि.मी. पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला आहे. चिखलदरा १९४.४ मि.मी., अमरावती १७९.३ मि.मी., अंजनगाव १७६.४ मि.मी.,भातकुली १५९.८ मि.मी., वरुड १३२.१ मि.मी., अचलपूर १५५.९ मि.मी., दर्यापूर १३८.५, मि.मी., धारणी १०५.८ मि.मी. तर सर्वात कमी चांदूररेल्वे तालुक्यात ६०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. प्रत्यक्ष पडलेल्या पावसामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात २४२.१ टक्के, नांदगाव तालुक्यामध्ये २३८.८ टक्के, अमरावती १८९.६ टक्के, भातकुली १५५.६ टक्के, अचलपूर १६०.८ मि.मी. व सर्वात कमी ५८.८ टक्के पावसाची नोंद चांदूररेल्वे तालुक्यात करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्ह्याची ही स्थिती आहे. २१ दिवसांत नांदगावात सर्वाधिक पाऊ स१ जून ते २१ जून दरम्यान जिल्ह्यात सरासरी १४४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २४५.२ मि.मी. पाऊ स नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला आहे. चिखलदरा १९४.४ मि.मी., अमरावती १७९.३ मि.मी., भातकुली १५९.८ मि.मी., अचलपूर १५५.९ मि.मी., दर्यापूर १३८.५ मि.मी. व चांदूररेल्वे तालुक्यात सर्वात कमी ६०.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या महसूल मंडळात झाली अतिवृष्टीजिल्ह्यात २१ जूनला २४.२ मि.मी. पाऊ स पडला. यामध्ये तिवसा महसूल मंडळात ६८.६ मि.मी., चिखलदरा ७८.०४ मि.मी., टेंभूरखेडा ६७.३, वरुड ७४.६ मि.मी., चोणी ७१.४ मि.मी. पाऊ स पडला. हा पाऊ स ६५ मि.मी.पेक्षा अधिक असल्याने ही अतिवृष्टी समजण्यात येते. शनिवारी वरुड तालुक्यात सर्वाधिक पाऊ सशनिवारी वरुड तालुक्यात सर्वाधिक ५६.८ मि.मी. पाऊ स पडला आहे. तिवसा तालुका ५१.९ मि.मी., चिखलदरा तालुक्यात ४२.४ मि.मी., अमरावती तालुक्यात ४१.५ मि.मी., मोर्शी २६.१ मि.मी. व सर्वात कमी दर्यापूर तालुक्यात ६.८ मि.मी. पाऊ स पडला आहे.
पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी
By admin | Published: June 22, 2015 12:04 AM