गजानन मोडोड
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यांसह २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सार्वत्रिक सरासरी ५०.४ मिमी पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. याशिवाय सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे.
जिल्ह्यात ५ जुलैपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरुच आहे. आता पुन्हा तीन दिवस येलो अलर्ट असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सततच्या पावसाने सोयाबीनवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तुरीवर ‘मर’ बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने झाडे सुकली आहेत.