अमरावती : पावसाळा संपता-संपता पावसाने पुन्हा दमदार बॅटींग सुरु केली आहे. शनिवारी १८ मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर पाच दिवसांचा ब्रेक झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा पाच मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. सततच्या पावसाने काही भागात शेताचे तलाव झाल्याचे दिसून येते. अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे सुरु झालेले आहे.
२४ तासात जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी २९.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये वरुड तालुक्यात सर्वाधिक ६२.५ मिमी पाऊस झालेला आहे. सर्वात कमी ५.७ मिमी पाऊस अचलपूर झालेला आहे. याशिवाय तिवसा तालुक्यात वरखेड मंडळात ९७.८ मिमी, वरुड तालुक्यातील वरुड मंडळात (१२१.८),शेंदूरजना घाट (७४.८),वाठोडा (६५.५) व आतापर्यंत सर्वात कमी झालेल्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी मंडळातही ६५ मिमी पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झालेली आहे.