अमरावती : हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे राज्यात वेळेआधी मान्सूनचे आगमन झाले आहे व यंदा चांगला पाऊस राहण्याचे भाकीत हवामान विभागाने केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४८२ पूरप्रवण गावांना सतर्क राहावे लागणार आहे. तालुका, जिल्हा मुख्यालयी असणारी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. एकंदर जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाला समोर पूरस्थिती हाताळण्याचे आव्हान उभे राहणार आहे.
मान्सूनपूर्व तयारीला महापालिका प्रशासन लागले आहे. यामध्ये आपत्ती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहे. या चार महिन्यांच्या काळात विभागनिहाय जबाबदारीचे वाटप आयुक्त प्रशांत रोडे यांनी यापूर्वीच केले. सध्या शहरातील अंबा नाल्यासह अन्य मुख्य व लहान नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. याशिवाय पाचही झोनमध्ये आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. जिल्ह्यात आठ ठिकाणी विजेला अटकाव करणारी यंत्रणा कायार्न्वित करण्यात आलेली आहे.
गतवर्षी सरासरीच्या ९६.२ टक्के पाऊस पडला होता. एकूण ११ मोठ्या व ३०२ लहान नद्या व नाले जिल्ह्यात आहेत. यामुळे ४८२ गावे संभाव्य पूरबाधित गावांच्या यादीमध्ये आहेत. अशी परिस्थिती उद्भवल्यास ६५६ तात्पुरते निवारे तयार आहेत. याशिवाय विविध साहित्यांनी जिल्ह्याचा आपत्ती प्राधिकरण विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली.
पाईंटर
जिल्ह्यातील प्रमुख नद्या : ११
नदीशेजारील गावे : ४८२
पूरबाधित होणारी तालुके : १२
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान : ७६९ मिमी
प्रशासनाची काय तयारी
मोटर बोट : ०६
लाइफ जॅकेट : २२२
लाईफ रिंग : १२६
रोप बंडल : २२
सर्च लाईट : २२
बॉक्स
अग्निशमन दल सज्ज
* आपत्ती निवारण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज झालेला आहे व या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक २५७६४२६ हा आहे.
* या विभागाला स्थानिक अधिकारी, नियंत्रण कक्ष, शहर अभियंता, सहायक अभियंता (विद्युत) यांच्याशी समन्वय ठेवावा लागेल.
*आपत्ती नियंत्रण संदर्भातील सर्व साहित्य सज्ज ठेवावे लागेल, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.
बॉक्स
असा मिळतो इशारातालुका नियंत्रण कक्षाकडून नदीची पाणीपातळी वाढल्यास किंवा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यास तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षद्वारे तसेच प्रकल्प विभागाद्वारे अलर्ट दिल्या जातो. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास त्या नदीला अचानक पूर येण्याची शक्यता असते. यासाठी तालुक्याचा नियंत्रन कक्ष व गाव समिती नेहमी अलर्ट असते.
कोट
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोटी, शोध व बचाव पथके आवश्यक सर्व साहित्यासह २४ तास सज्ज आहेत. जिल्हा मुख्यालयासह सर्वच तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी
--------------
बॉक्स
शहरातील धोकादायक इमारती
१) शहरात सी-१ वर्गवारील ५१ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या मालमत्ताधारकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजाविल्या आहेत.
२) या धोकादायक इमारतीमध्ये २५० चेवर नागरिक राहतात. या मालमत्ताधारकांना वीज व पाणी बंद करण्याच्या नोटीस झोनस्तरावरुन बजावण्यात येत असल्याचे सांगण्यात आाले.
३) आतापर्यत सी-१ वर्गवारीतील पाच इमारती महापालिकेच्या बांधकाम विभागाने पाडल्या आहेत. याशिवाय ११ मालमत्ताधारकांनी नोटीसविरोधातत अपील केले आहे.