लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.तालुक्यात ४१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. आमला विश्वेश्वर, जळका (जगताप), कावला, सालोरा खुर्द, निमला, सावंगी मग्रापूर या गावांत पाण्याचे टँकर पुरविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र एस.एस.इंगळे यांनी दिली. चांदूर रेल्वे शहरातही भीषण टंचाई असून, पालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मालखेड धरणाच्या तलावातून शहरास पाणीपुरवठा होत आहे. ते धरण अगदी मृतप्राय झाले आहे. त्या ठिकाणी पालिकेने बोअर केल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. परंतु, तांत्रिक अडचणीने पाटबंधारे विभागाने बोअरची परवानगी नाकारली. शेवटी पाणी हाऊस टाकीजवळ बोअर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी दिली. पाणीटंचाईमुळे तालुक्यात महिलांची वणवण वाढली आहे. पाण्यासाठी टँकर व विहिरींवर वाद होत आहेत.सिंचन प्रकल्प रखडलेरायगड, दिघी सोनगाव, आमला पाथरगाव उपसा जलसिंचन प्रकल्प निधीअभावी पाच वर्षांपासून रखडले आहेत. जलयुक्त शिवारचा केवळ गवगवा करण्यात आला; मात्र त्यातून ना जलसंधारण झाले, ना जलसंवर्धन. प्रत्येक वर्षी टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला जात असतो. मात्र, त्यात केवळ मर्यादित कालावधीच्या तात्पुरत्या उपाययोजना असतात. पाणीच नसेल तर विहिरी किंवा बोअर अधिग्रहीत करुन काय लाभ?. नियोजन बारगळेलच ना?
चांदूर रेल्वे तालुक्यात भीषण टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:07 AM
तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.
ठळक मुद्देसंत्राबागा सलाईनवर। शासकीय यंत्रणा कुचकामी