नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मेळघाटात शासनातर्फे आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी महिलांचा डॉक्टरांपेक्षा दार्इंवर विश्वास दृढ आहे. अतिदुर्गम हतरू येथील पुनाय सखाराम तांडीलकर या अनेक महिलांच्या प्रसूती काळात या भागात मदतगार ठरल्या आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात अशा दार्इंची संख्या पाचशेवर आहे.दुर्गम भागात रस्ते, वाहने, वीजपुरवठा, तज्ज्ञांचा अभाव यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविणे वा इतर तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची वेळ नित्याचीच आहे. मात्र, रुग्णांना भूमका, दाई हे केव्हाही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी येथील डॉक्टरसुद्धा भूमका आणि दार्इंची मदत घेतात. धारणी, चिखलदरा तालुक्यात ८० दायींना आरोग्य विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याद्वारे येथील मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर यंत्रणेचा भर आहे. गर्भवती महिलेची आरोग्य केंद्रातच प्रसूती झाल्यास दाईला प्रत्येकी ४०० रुपये दिले जातात.
अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी भागात ‘दार्इं’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:48 PM
मेळघाटात शासनातर्फे आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी महिलांचा डॉक्टरांपेक्षा दार्इंवर विश्वास दृढ आहे. अतिदुर्गम हतरू येथील पुनाय सखाराम तांडीलकर या अनेक महिलांच्या प्रसूती काळात या भागात मदतगार ठरल्या आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात अशा दार्इंची संख्या पाचशेवर आहे.
ठळक मुद्दे१५ गावांसाठी दाईच देवदूत पावसाळ्यात चिखल वा पावसामुळे मेळघाटातील १५ गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी प्रसूत महिलेला आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे शक्यच होत नाही. अशावेळी त्यांना दार्इंचाच आधार घ्यावा लागतो. ही बाब हेरून आरोग्य केंद्रामार्फत त्या-त्या गावांतील