मोर्शी : तालुक्यातील पाळा येथे प्रहार जनशक्ती संघटनेचे शाखाप्रमुख नरेंद्र सोनागोते यांनी सोमवारी गावात पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य करिश्मा सोनागोते, राजू बिसांद्रे, नितीन ढोमणे, राहुल साठे सहभागी झाले. ना. बच्चू कडू यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली जाणार आहे.
--------------
एसटी बस स्थानकावर खिसेकापू जेरबंद
मोर्शी : गणेश भानुदास गायकवाड (रा. प्रशांत कॉलनी) हे वरूडकरिता एसटी बसमध्ये चढत असताना त्यांचे पाकीट मारले गेले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू मडावी व कॉन्स्टेबल संदीप वानखेडे यांनी अवघ्या काही तासांत खिसेकापू मोहम्मद अल्लू ऊर्फ शरीफ मोहम्मद साबीर (२८, रा. पेठपुरा) याला अटक केली. मोर्शी पोलिसांनी २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
-------------
मोर्शीत निवृत्त शिक्षकांचा संघ
मोर्शी : शहरात सेवानिवृत्त शिक्षक संघाची स्थापना नुकतीच करण्यात आली. शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशासन त्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करत असते. यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न हा संघ करणार असल्याचे कळविण्यात आले. अध्यक्षपदी राजेंद्र देशमुख, कार्याध्यक्षपदी बाबुराव वानखडे, सचिवपदी किशोर मानकर यांच्यासह अशोक केदारे, के.यू. सिरसाट, रामदास मुंदाने, विठ्ठल काकपुरे, भरत राऊत, जफर हुसेन शेख, राजाभाऊ खवले, संजय वानखडे, मधुकर सोमकुवर, साहेबराव पखाले, प्रदीप खवले, चक्रधर ठवळी, भास्कर मोकलकर, मोहन खटाळे, प्रकाश भोजने, विजय राऊत, दीपक बेले, अशोक कांडलकर, राजेंद्र गोंडाणे, दिलीप यावलीकर, प्रकाश राऊत, शोभा इंगोले, नंदा कर्णासे, ज्योती वसू, सुनंदा नवघरे, विजया पुंड, शोभा चौधरी आदींचा समावेश आहे.
------------------