चांदूर रेल्वे विकास क्लब, ग्रामसेवा लोकअभियानचा उपक्रम
चांदूर रेल्वे : ग्रामसेवा लोकअभियान (विदर्भ) व चांदूर रेल्वे विकास क्लब यांच्या सहकार्याने एकल महिला, अपंग, अतिशय गरजू लोकांना ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत विविध वस्तूंचा समावेश असलेले कीट देण्यात आले.
ग्रामसेवा लोकअभियानचे संयोजक बंडू आंबटकर यांनी अभियानाची सुरुवात चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव, शिवणी, नेकनामपूर, राजना या गावांतून केली. एकल महिला व कुटुंबांना किराणा कीटचे वाटप घरपोच करण्यात आले. यात तेल, साखर, रवा, खोबरेल तेल, कपड्याचा साबण, डेटॉल साबण, मीठ पुडा, चहा पुडा, सोयाबीन वडी, निरमा पावडर आदी साहित्याचा समावेश आहे.
चांदूर रेल्वे विकास क्लबचे अध्यक्ष डॉ. क्रांतिसागर ढोले, बाळू कडू, महेश भूत, तळोकर, जितू गोरे, शेखर पुतळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाला सहकार्य केले. हा उपक्रम लोकसहभागातून निरंतर सुरू ठेवण्याचे मत व्यक्त करण्यात आले.