शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महिलांपर्यंत पोहोचलीच नाही हेल्पलाईन

By admin | Published: November 25, 2015 12:41 AM

अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे.

१२ पोलीस ठाण्यांचाही खो : नियंत्रण कक्षात विशेष पथक; पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिला जागरुकस्टिंग आॅपरेशनअमरावती : अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे. मात्र, हा क्रमांक महिलांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा व शहर पोलीस दल अपयशी ठरले. जिल्हाभरातील २९ पैकी १२ पोलीस ठाण्यांमध्ये आजही हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित झालेला नाही. जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘महिला हेल्पलाईन’ची सतर्कता तपासण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. त्या दरम्यान उघड झालेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. महिलांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन कार्यान्वित असून ग्रामीण व शहर पोलीस हद्दींसाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर कुठलीही महिला २४ बाय ७ तक्रार नोंदवू शकते. शहर व ग्रामीण नियंत्रण कक्षांशी हे क्रमांक जोडले गेले आहेत. शहर हद्दीतून आलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लागलीच सतर्क केले जाते. शहरातील सर्व १० पोलीस ठाणे या सेवेशी जोडली आहे. ग्रामीण पोलिसांचीही कार्यपद्धती अशीच आहे. तथापि, एकूण २९ पैकी केवळ १७ पोलीस ठाणेच या हेल्पलाईनची जोडली गेली आहेत.१०९१ या क्रमांकावर पलिकडून महिलेची तक्रार आल्यास सबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही तक्रार नोंदवहीत नोंदविली जाते. त्यानंतर ती तक्रार संबधीत पोलीस ठाणे आणि महिला सेलकडे हस्तांतरीत करण्यात येते. अवघ्या १० ते १५ मिनीटांमध्ये या प्रक्रियेला गती दिली जाते. पोलीस पथकही घटनास्थळी पाठविले जाते. याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. हेल्पलाईनची विश्वासार्हता धोक्यात१०९१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्यासाठी महिलाही समोर येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. बहुतांश महिलांना हेल्पलाईनबाबत माहिती नाही किंवा त्यांना पोलीस ठाणेच जवळचे वाटत असावे, अशी शक्यता नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दिल्लीमधील निर्भया हत्याकांडानंतर महाविद्यालयीनस्तरावर तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आज त्या तक्रार पेट्यांमध्ये तक्रारी नाहीत. अनेक महिने त्याचे कुलूपही उघडत नाही. एकूणच अनास्था बघता हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण होईलच, अशी शाश्वती अनेक महिलांना नाही. तक्रारीसाठी थेट पोलीस ठाण्यांनाच पहिली पसंती दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातून १०९ तक्रारीशहर पोलीस आयुक्तालयाशी १० पोलीस ठाणे संलग्न आहेत. या १० ठाण्यांतर्गत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर १ जानेवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत १७ ग्रामीण पोलीस ठाण्यांना एकूण ९२ तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित पोलीस ठाण्याच्या स्तरावर त्या तक्रारीवरून कारवाई आरंभण्यात आली. जनजागृतीचा अभाव १०० आणि १०१ हे हेल्पलाईन क्रमांक गाव खेड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. १०० म्हणजे पोलीस व १०१ म्हणजे अग्निशमन हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. तथापि १०९१ या क्रमांकावर महिलांच्या तक्रारी नोंदविल्या जातात, तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते, हेच मुळी जिल्ह्यातील नागरिकांना ठाऊक नाही. याबाबत जागरुकता असलेल्या नागरिकांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ठोस जनजागृतीची गरज असल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’च्या अभ्यासात पुढे आला. हेल्पलाईन क्रमांकाबाबत जनजागृती मोहिम यापूर्वीच राबविली आहे. अभाव असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहचण्यासाठी माध्यमांची मदत घेवू.-सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त.बिएसएनएलच्या तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हेल्पलाईन कार्यान्वित नाही. बहुतांश नागरिक १०० क्रमांकाचा वापर करतात. महिलांविषयीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतो. -लखमी गौतम, पोलीस अधीक्षक.