अमरावती : जगात नवनवीन आजार उदयास येत आहेत. त्यावर नियमित संशोधन होऊन त्यावर उपचारसुद्धा निघत आहे. आज जागतिक हिमोफिलिया दिन आहे. हिमोफिलिया या आजाराबाबत माहिती लोकांना नाही. त्यामुळे हा आजार हळूहळू वाढत आहे. यामुळे येणारी पिढी ही आजारी होत चाललेली आहे. हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार आहे. आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला होतो. त्यावर उपचार न झाल्यास हिमोफिलियाग्रस्त व्यक्तीला अपंगत्व येऊ शकतो. हिमोफिलियाग्रस्त व्यक्तीच्या रक्तात, रक्त गोठवण्याचे काम करणाऱ्या १३ घटकांपैकी १ किंवा अधिक घटकांची कमतरता असणे किंवा ते घटक त्यांच्या रक्तात अजिबातच नसतात. त्यामुळे कधीही शरीरात रक्तस्त्राव होतो.हिमोफिलिया आजारावर उपचारहिमोफिलिया हा अनुवांशिक आजार असून त्यावर कुठलाही उपचार नाही. हा आजार मुळातून नाहीसा होत नाही. हिमोफिलियाग्रस्त रुग्णांवर उपचार म्हणून रक्त, प्लाज्मा व फॅक्टरचा उपयोग केला जातो. या उपचारात ज्या घटकाची कमतरता रुग्णांमध्ये असेल त्यानुसार रुग्णांच्या शरीरात शिरेच्या माध्यमातून रुग्णाला देण्यात येते. त्यामुळे रुग्णाला होणारा त्रास कमी होतो. हिमोफेलीया रुग्णांना फॅक्टर श्ककक, फॅक्टर क, ऋएकइअ, फॅक्टर श्कक रुग्णाच्या रोगनिदान नुसार दिल्या जाते. (प्रतिनिधी)हिमोफिलियाचे प्रकारहिमोफिलिया रुग्ण : हिमोफिलिया हा आजार फक्त पुरुषांना होतो. त्या व्यक्तीला निळसर काळपट रंगाच्या गाठी येतात, सतत रक्तस्त्राव होणे, सांधे दुखणे, जखम झाल्यास त्यातून रक्तस्त्राव होणे, सूज येणे, स्रायूत रक्तस्त्राव होणे याप्रमाणे कुठल्याही प्रकारे पुरुषाला त्रास होत असल्यास त्याला हिमोफेलियाचे रुग्ण असे संबोधले जातात.हिमोफिलिया वाहक : यामध्ये फक्त स्त्रिया हिमोफिलिया आजाराचे वाहक असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे रक्तस्त्राव होत नाही, सांधे दुखत नाही. सूज येत नाही. ती स्त्री संपूर्ण निरोगी असते. पण वाहक स्त्रियांपासून होणाऱ्या मुलांना हिमोफिलिया आजार होण्याची शक्यता अधिक असते. मुली ह्या वाहक होण्याची शक्यता असते.
हिमोफिलिया आनुवंशिक आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 12:07 AM