नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधच्या कामातील भ्रष्टाचाराची पोलखोल 'लोकमत'ने केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शाखा अभियंता व पुरवठादार वजा कंत्राटदारांनी आता लपवाछपवी चालवली असून, चौकशीत कामे योग्य दिसावी यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, काजलडोह, डोमा, रजनीकुंड, कोयलारी, पाचडोंगरी, कालापांढरी, गांगरखेडा, हतरू, राहू, बोरदा, खारी, हिल्डा, कारदा आदी २९ पेक्षा अधिक गावांलगतच्या नदी नाल्यांवर प्रत्येकी १८ ते २० लक्ष रुपयांपर्यंत सिमेंट नालाबांधची कामे करण्यात आली. काही व्हायची आहेत. अशा जवळपास सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कामाचा फज्जा उडाला आहे.फलकावर अपूर्ण माहितीमग्रारोहयो अंतर्गत सीएनबीच्या कामाची संपूर्ण माहिती फलकावर नमूद करणे आवश्यक होते. मात्र संबंधित पुरवठादार वजा कंत्राटदारांनी फलक लावताना त्यावर कुठल्याच प्रकारची माहिती भरली नाही. तसेच संबंधित शाखा अभियंतालासुद्धा त्याची गरज वाटली नाही. त्यामुळे कामावर प्रत्यक्ष झालेला खर्च, किती मजुरांना रोजगार मिळाला, काम केव्हा सुरू झाले आदी महत्त्वपूर्ण माहिती टाकण्यात आली नाही.खोलीकरण कागदावरच झालेसिमेंट नाला बांधकाम करताना जवळपास शंभर मीटर खोलीकरण करणे गरजेचे होते. मात्र, ते करण्यात आले नाही. बंधाऱ्याचे कागदोपत्रीच खोलीकरण केल्याचे दाखवून एक ते दीड लक्ष रुपये उकळण्यात आले आहेत.
ठेकेदारांकडून लपवाछपवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:18 AM
तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधच्या कामातील भ्रष्टाचाराची पोलखोल 'लोकमत'ने केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शाखा अभियंता व पुरवठादार वजा कंत्राटदारांनी आता लपवाछपवी चालवली असून, चौकशीत कामे योग्य दिसावी यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देमेळघाटातील वादग्रस्त सीएनबी : सिमेंट बांधाचे कागदावरच खोलीकरण