शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अमरावती विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंकडून उच्च न्यायालय, राज्यपालांची दिशाभूल

By गणेश वासनिक | Published: April 03, 2023 6:34 PM

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सिनेट रचनेची अधिसूचना प्रसिद्ध  झाल्यानंतरही निवडणूक प्रक्रिया थांबविली. ...

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सिनेट रचनेची अधिसूचना प्रसिद्ध  झाल्यानंतरही निवडणूक प्रक्रिया थांबविली. ही बाब विद्यापीठ कायदे, नियमांना छेद देणारी गंभीर असून त्यांनी उच्च न्यायालय, राज्यपालांची दिशाभूल केली, असा घणाघाती आरोप नागपूर टिचर्स असोशिएशनने (नुटा) पत्रपरिषदेत सोमवारी केला आहे.

नुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी, उपाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम २८(४) आणि शासन एकरूप परिनियम क्रमांक १/२०१७ च्या ९(२) आणि एकरूप परिनियम क्रमांक ४/२०१९ च्या ३(१) च्या तरतुदी अंतर्गत अधिसभा सदस्यांमधून विविध प्राधिकरणांवर निवड तथा नामनिर्देशनासाठी अधिसभेची विशेष सभा १० फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्याचे ठरविले होते. या सभेच्या अनुषंगाने विषय सूचीप्रमाणे राहील, असे सिनेट सदस्यांना कळविण्यात आले.

मात्र, नव्याने आलेले प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रभार स्वीकारल्यानंतर काही तासातच कायदेशीरित्या बोलावण्यात आलेली अधिसभा उद्धस्त करण्याचा डाव रचला. त्यांना कोणतेही अधिकार नसताना ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सभा पुढे ढकलण्याबाबतचे पत्र राज्यपालांना पाठविले आणि १० फेब्रुवारी रोजीची निवडणुकीची सभा होणार नाही, असा प्रयत्न केला. मात्र, प्रभारी कुलगुरु डॉ. येवले यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने डॉ. प्रमाेद यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याबाबत कोर्टाने ताशेरे ओढले आणि कुलगुरुंच्या पत्राला स्थगनादेश दिला. त्यानंतर १४ मार्च २०२३ रोजी कायदेशीर बाबींची पूर्तताहोऊन पूर्वीच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बजेटची सभा पार पडली. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या निवडणुकीच्या तत्वज्ञानाच्या विरोधात कृती केली. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. पत्रपरिषदेला नुटाचे प्रकाश तायडे, डॉ. महेंद्र मेेटे आदी उपस्थित होते.संकेतस्थळावर सिनेट रचनेची अधिसूचना नाही

अमरावती विद्यापीठाने २१ जानेवारी रोजी अधिसूचना क्रमांक १५/२०२३ अन्वये सिनेट रचनेची अधिसूचना जाहीर केली होती.

तरीही प्रभारी कुलगुरू डॉ. येवले यांनी सिनेट रचना झाली नाही, असे उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि राज्यपालांना कळविले होते, हे विशेष. आतापर्यंत ही अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नाही, असे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.