लोकमत आॅनलाईनअमरावती : डॉक्टर, वकील, राजकीय पदाधिकारी, सेवानिवृत्त डीवायएसपी यांसारख्या उच्चशिक्षितांच्या भूमिपुत्र कॉलनीत कुंटणखाना चालविला जात असल्याने रहिवासी त्रस्त होते. मात्र, ज्याने आवाज उचलला, त्याचे तोंड दाबण्याचेही प्रकार चालायचे. त्यामुळे या कुंटणखान्याला विरोध करण्याचे कोणीही धाडसच केले नाही.भूमिपुत्र कॉलनीतील मनीष मार्टिनच्या घरात चालणाºया कुंटणखाना बहुतांश तरुणांना परिचित आहे. प्रेमीयुगुलांसाठी तर ते प्रेमालापाचे ठिकाणच बनले होते. प्रेमीयुगुल किंवा वेश्याव्यवसायातील मुली आॅटोरिक्षाचालकांच्या माध्यमातून मार्टिनच्या घरापर्यंत पोहोचायच्या. आत शिरल्यानंतर चार भिंतीच्या आड जे काही व्हायचे, ते भूमिपुत्र कॉलनीवासीयांसाठी दैनंदिन चर्चेचा भाग बनला होता. मात्र, त्याकडे परिसरातील उच्चशिक्षितांनी दुर्लक्ष केले होते. हा गंभीर प्रकार रहिवाशांनी उघड करणे व विरोध करणे अपेक्षित होते. पोलिसांच्या माध्यमातून हा गंभीर प्रकार रहिवाशांना बंद पाडता आला असता. मात्र, मार्टिनच्या घरात चालणाऱ्या या गंभीर प्रकाराचा विरोध करण्याचे कोणाचेच धाडस झाले नाही. मार्टिनच्या घरात चालणाऱ्या या प्रकाराचा विरोध एका रहिवाशांना केला होता. मात्र, मार्टिनने काठीने हल्ला करून त्यांचे तोंड बंद केले होते. यासंदर्भात मार्टिनविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल असल्याचे रहिवासी सांगत आहे. विशेष म्हणजे, मार्टिनच्या घरातील कुंटणखान्याची माहिती पोलिसांनीही होती. त्यांनीच दखल घेतली नाही, तर मग जनसामान्यांनी पुढे कसे यावे, असा प्रश्न भूमिपुत्र कॉलनीतील रहिवाशांना पडला होता. मार्टिनच्या घरातील सर्व प्रकार छुप्या मार्गाने चालायचे. त्याच्या घरात ये-जा करणारी मंडळी आस्तकदम यायची. त्यामुळे उघडपणे कोणालाच विशेष त्रास नव्हता. या स्थितीमुळे रहिवाशांनी आपले डोळे बंद करून कुंटणखान्याला विरोधच केला नाही. महिलांसाठी लज्जास्पद वाटणाºया या गंभीर प्रकारावर रहिवाशांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मार्टिनचे हौसले बुलंद झाले. अखेर एका मुलीच्या तक्रारीमुळे मनीष मार्टिनच्या कुंटणखान्याचा पदार्फाश झाला आहे.
उच्चशिक्षितांच्या वस्तीत चालायचा कुंटणखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:21 PM
डॉक्टर, वकील, राजकीय पदाधिकारी, सेवानिवृत्त डीवायएसपी यांसारख्या उच्चशिक्षितांच्या भूमिपुत्र कॉलनीत कुंटणखाना चालविला जात असल्याने रहिवासी त्रस्त होते.
ठळक मुद्देभूमिपुत्र कॉलनीवासी त्रस्त : आवाज उचलणाऱ्यांचे दाबले जायचे तोंड