लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे सहा टक्के मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच संपूर्ण आठही विधानसभा मतदारसंघात शांततेत विनातक्रार मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६०.५७ टक्के एवढी होती. यात विक्रमी ६ टक्क्यांनी वाढ होत यावर्षी ६६.४० टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. त्यासोबतच जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे.
मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी, जनजागृती आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने मतदानाचा टक्का सुधारला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणतीही तक्रार आलेली नाही. प्रामुख्याने मतदारयादीमध्ये निवडणुकीपूर्वी १ लाखाहून अधिक नवीन मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी चांगला सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदारांचे आभार मानले आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ८ लाख ९१ हजार ३ पुरुष, ७ लाख ९९ हजार ८४७ महिला आणि तृतीयपंथी ३० अशा एकूण १६ लाख ९० हजार ८८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.४० आहे.
धामणगांव रेल्वे एकुण मतदान - २२१७१९ पुरुष - ११७२२२ महिला - १०४४९७ इतर - 00 टक्केवारी - ६९.७५
अमरावती एकुण मतदान - २११६०६ पुरुष - ११०९९७महिला - १००५९९इतर - १०टक्केवारी - ५६.५१
बडनेराएकुण मतदान - २०९८०९पुरुष - १०८४६५महिला - १०१३३९इतर - १५टक्केवारी - ५७.६७
मेळघाटएकुण मतदान - २२०९१३पुरुष - ११४५२३ महिला - १०६३८६इतर - ०४टक्केवारी - ७३.१४
तिवसाएकुण मतदान - २०१४१२पुरुष - १०७४५८महिला - ९३९५४इतर - 00टक्केवारी - ६७.९३
दर्यापूरएकुण मतदान - २०६१८८पुरुष - ११०६८८महिला - ९५५००इतर - 00टक्केवारी - ६६.८५
अचलपूरएकुण मतदान - २१०६१४पुरुष - ११२१३१महिला - ९८४८२इतर - ०१टक्केवारी - ७२.०७
मोर्शीएकुण मतदान - २०८६१९पुरुष - १०९५१९महिला - ९९१००इतर - 00टक्केवारी - ७१.६६