आंदाेलन : जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
अमरावती : केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणा विरोधात १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बहूजन समाज पार्टीचे वतीने (बीएसपी)एकदिवसीय धरणे दिली.यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
बीएसपीच्या प्रमुख मागण्यामध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाला कायम ठेवण्यात यावे,ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे,घरगुती गॅस सिलिंडरच्या किमंती कमी करण्यात याव्यात, शेतमालाला हमी देण्यात यावा,पेट्रोल-डिझेलच्या कमी करण्यात याव्यात,वाढती महागाई रोखण्यात यावी,कोरोनामुळे हातघाईस आलेल्या झोपडपट्ट्या व मागासवर्गीय वस्तीमधील नागरिकांचे वीजबिल माफ करण्यात यावे, खाद्य तेलाचे भाव कमी करावे,अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी, अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शहर प्रमुख सुदाम बोरकर, निर्मला बोरकर, उमेश मेश्राम, जयदेव पाटील, अक्षय माटे, विनय पाहाळण, दीपक पाटील, सुधाकर माेहोड, हिरालाल पांडे, मुकेश मंडपे, चिंतामन खोब्रागडे, राहुल सोमकुंवर, रामभाऊ पाटील किरण सहारे, सूरज भगत, साधना गडलिंग, सागर डाहाके व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.