वरूड : शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याचा आरोपी घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याने गृहरक्षक दलाचे सैनिक संतोष राधेशाम मरकाम (२५, शेंदूरजनाघाट) हे गंभीर जखमी झाले होते. नागपूरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शेंदूरजनाघाट परिसरात शोककळा पसरली आहे. कर्तव्यावर असलेल्या सैनिक संतोषला पोलीस दलाच्यावतीने सलामी देण्यात आली.
२७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला अमरावती जिल्हा न्यायालयात घेऊन जाताना बारागावनजीक पोलीस वाहनाला अपघात झाला. यात संतोष मरकाम यांचा उपचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेंदूरजनाघाट पोलिसांसह वरूड, बेनोडा पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली.
----