गणेश देशमुख ।आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. एकतर्फी प्रेमातून शहरात अलीकडेच तरुणींवर झालेल्या हल्ल्यांच्या दोन घटनांची किनार या बैठकीला आहे. ही बैठक याचमुळे निर्णायक स्वरूपाची असू शकेल.यापूर्वीही राजापेठ भागात भररस्त्यावर चाकुहल्ला करून तरुणीला भोसकल्यानंतर ना. पाटील यांनी अमरावती गाठून दिरंगाई करणाºया पोलिसांच्या चौकशीचे आदेश जारी केले होते. त्याप्रकरणी झालेल्या वेगवान चौकशीअंती फ्रेजरपुºयाचे ठाणेदार आणि इतर दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.शहरात घरफोड्यांचे सत्र अनेक दिवस सुरू होते. रात्री आणि दिवसाही घरफोड्या करण्याची हिंमत गुन्हेगारांनी केली. या मुद्द्यावर नामदार पाटील हे पूर्वीपासूनच 'वॉच' ठेवून होते. शहरातील असुरक्षित वाहतूक हादेखील त्यांच्याठाई महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. या विषयावर त्यांनी पोलीस अधिकाºयांची कानउघाडणीही केली होती. शुक्रवारच्या बैठकीत या सर्वच मुद्यांवर नामदार पाटील जाब विचारू शकतात. सकाळी १० वाजता सुरू होणारी ही बैठक फार लांबणारी नसली तरी परिणाम मात्र गंभीर स्वरुपाचे असू शकतात. काही आमदारही या बैठकीला उपस्थित असतील. बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत ना. पाटील हे पत्रकारांशीही संवाद साधतील.शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात बैठक बोलविली आहे. शहरातील चिंताजनक घटनांबाबत आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होईल.- रणजित पाटील,गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
गृहराज्यमंत्र्यांची उद्या बैठक महत्त्वपूर्ण घोषणा होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:24 AM
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
ठळक मुद्देशासन गंभीर : घरफोड्या, महिलांची सुरक्षितता मुख्य मुद्दे