अमरावती : कारागृहातील मनुष्यबळाची वानवा ही नित्याचीच बाब असून कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात येणारे गृहरक्षक दल (होमगार्ड) १ मे पासून कारागृहातून हद्दपार करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन विभागाने घेतला आहे. कारागृहात अंतर्गत अथवा बाह्य अशा कोणत्याही प्रकारच्या कर्तव्यासाठी होमगार्ड नेमायचे नाहीत, असे ठरविण्यात आले आहे.नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका होमगार्डच्या बुटात चक्क दोन मोबाईल बॅटरी निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे होमगार्ड कैद्यांना बरेच साहित्य, वस्तू पुरवीत असल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात मनुष्यबळाची वानवा असल्याने येथे कारागृह आणि कैद्यांच्या संरक्षणासाठी होमगार्ड तैनात केले जात होते. अमरावती मध्यवर्ती कारागृहात १० होमगार्ड कर्तव्यावर तैनात आहेत. मात्र, या होमगार्ड्सना कारागृहाच्या आत कैद्यांच्या संरक्षणाची जबाबदारी दिली जात नव्हती, असे कारागृह अधीक्षकांनी सांगितले आहे. ‘होमगार्ड’मुळे कारागृहांच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष कारागृह प्रशासनाने काढला आहे. परिणामी नाशिक, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, येरवडा कारागृहात ‘होमगार्ड’ची सेवा घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने अधिकृत परिपत्रक काढले आहे. कारागृहात मनुष्यबळाची वानवा असली तरी सुरक्षेची जबाबदारी जुने बंदीजन आणि सुरक्षा रक्षकांवर सोपविण्याचे ठरविण्यात आले आहे. अमरावती कारागृहात सध्या ‘होमगार्ड’ची सेवा सुरू असली तरी त्यांना तटाच्या बाहेरील भागात कर्तव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वावर तसेच तटाच्या बाहेर होमगार्ड कर्तव्यावर असल्याचे दिसून येते. मात्र, १ मे पासून ‘होमगार्ड’ची ही सेवा थांबणार आहे. (प्रतिनिधी)१ मे पासून सेवा नाही : कैद्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने निर्णयअमरावती कारागृहात होमगार्डला दुय्यम कामेअमरावती मध्यवर्ती कारागृहात होमगार्डला दुय्यम दर्जाची कामे दिली जात होती. कारागृहाच्या आत अथवा कैद्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोेपविली जात नसल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. सागवान वृक्षांचे जतन, रखवाली, तटाची सुरक्षा अशी दुय्यम दर्जाची कामे होमगार्ड्सकडून केली जात होती. मात्र, आता कारागृह प्रशासनाने १ मेपासून होमगार्डसना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.होमगाडर््सना अतिरिक्त कामे सोपविली जात होती. त्यांना कैद्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले जात नव्हते. होमगार्डची सेवा बंद करावी, याबाबत अद्याप पत्र प्राप्त झाले नाही. वरिष्ठांकडून तसे पत्र प्राप्त झाल्यास होमगार्डची सेवा बंद करू.- जयंत नाईक, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.
-आता कारागृहातून ‘होमगार्ड’ हद्दपार
By admin | Published: April 20, 2016 12:19 AM