चिखलदरा : जंगलातील मोहफुल वेचण्याचे काम जोमात सुरू आहे. जंगलातील मोहाच्या झाडाखाली पडलेली फुले वेचण्यासाठी पहाटे ६ वाजताच आदिवासी मुलाबाळांसह रवाना होतात. मोहफुले वेचण्यासह ती अडगळीत ठेवून ‘सिड्डू’ काढण्याची परंपरा आहे. मंगळवारी घरांची राखरांगोळी होत असताना मावस्कर व धिकार परिवारातील सर्व सदस्य जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. जंगलात जाताना सोबत शिदोरी नेण्याची प्रथा आहे. त्यातच पेटलेल्या चुलीचा विस्तव हवेच्या संपर्कात आला व कुळामातीसह लाकूडफाट्याच्या या झोपड्यांनी पेट घेतला. झोपडीला लागलेली आग गावकऱ्यांना दिसताच एकच धावपळ सुरू झाली. घराघरातून पाणी पेटत्या घरांवर टाकण्यात आले. काहींनी पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करून पेटती घरे विझविली. त्यामध्ये मधु मावस्कर, बालक जावरकर, इंद्रजाल बेठेकर, अरूण अखंडे, बाबुलाल बेठेकर, राजेश बेठेकर सह . भोला मावस्कर, अनिल धिकार, दिपेश मावस्कर, मोहन धिकार, राजेश शेलुकर, विजू कास्देकर, सूरज धिकार, सूरज मावस्कर यांचा समावेश होता. आगीत बेचिराख झालेल्या घरांमुळे गोरगरिबांचा संसार उघड्यावर आला.प्रशासन पोहोचलेमाखला येथे आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार आर. मु. सुराडकर यांनी गांभिर्याने दखल घेत पाणी व आग विझविण्यापासून सर्व यंत्रणा हलविली. अधिनस्त सहकारी नायब तहसीलदार एन. डी. भेंडे, मंडळ अधिकारी विनायक बेलसरे व संबंधितांना पाठवून पंचनामा करण्यात आला. भीषण आग आटोक्यात असून नियमानुसार आवश्यक ती मदत देण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुराडकर यांनी सांगितले.
घरमालक जंगलात, गावकरी धावले
By admin | Published: April 08, 2015 12:28 AM