शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

धाडसी, प्रामाणिक महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2016 1:06 AM

धाडसी प्रवृत्तीने गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रामाणिक महिलांचा मंगळवारी जागतिक महिला दिनी पोलीस विभागाकडून गौरव करण्यात आला.

महिला दिन : पोलीस विभागाचा प्रेरणादायी उपक्रम, सहा महिला गौरवान्वित अमरावती : धाडसी प्रवृत्तीने गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रामाणिक महिलांचा मंगळवारी जागतिक महिला दिनी पोलीस विभागाकडून गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते या महिलांना गौरविण्यात आले. पोलीस आयुक्तालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त नितीन पवार, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, महिला सेलच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरज उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सरकारी अभियोक्ता सुनंदा कुळकर्णी, बालरोगतज्ज्ञ प्रतिभा काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात चार महिला पोलीस व प्रामाणिकपणाने इतर गरजू महिलांची मदत करणाऱ्या दोघींचा सत्कार करण्यात आला. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निर्मला भोई यांनी उत्कृष्ट तपास केल्यामुळे आरोपीला १० वर्षांची शिक्षा झाली. या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खोलापुरी गेटच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड यांनी एप्रिल २०१४ मधील निवडणुकीत नाकाबंदीदरम्यान २८ लाखांची रोख वाहनातून जप्त केली होती, या कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. शहर कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी उंबरकर यांनी चोरीच्या तपासकार्यात वर्धेतून आरोपीला अटक केली होती. आॅटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणात उंबरकर यांनी आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला होता. त्याचप्रमाणे महिला सेलमधील पोलीस कर्मचारी कमल लाडविकर यांनी सन २००१ मध्ये १३७ तक्रारींमध्ये पती-पत्नीला एकत्र आणून त्यांच्या संसार नव्याने सुरू करण्यास मदत केली होती. शहर कोतवालीच्या पोलीस कर्मचारी अनिता लांजेवार यांनी ‘मुस्कान आॅपरेशन’ या उपक्रमात ४ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले होते. तसेच १७ वर्षीय अपहृत मुलीचा शोध घेतला होता. राजापेठ पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेत निडरतेने कार्य करणाऱ्या पूजा सपकाळ यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८६४ वाहनचालकांवर कारवाई केली होती. यासर्व कर्तबगार महिला पोलिसांना यावेळी गौरवान्वित करण्यात आले. त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१५ रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये महिलेची पर्स आढळून आली होती. त्या पर्समधील १४ तोळ्याचे सोने त्या महिलेला परत करण्यात आले होते. त्यामध्ये अंबाविहार येथील सविता तानकर या महिलेने प्रामाणिकपणाचे उदाहरण देत हे दागिने पोलिसांकडे आणून दिले होते. कार्यक्रमात प्रतिभा विजय जंगले या महिलेचासुध्दा प्रामाणिकपणाबद्दल गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)