लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस विभागात सतत पंधरा वर्षे उत्कृष्ट सेवा देणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार घेण्यात आला.नांदगावपेठचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सतत पंधरा वर्षे उत्तम सेवाअभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच महाराष्ट्रदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचप्र्रमाणे फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी क्लिष्ट अशा हत्या प्रकरणाचा उलगडा करून आरोपीस अटक केली. त्यामुळे चोरमले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, पोलीस हवालदार बाबुराव खंडारे, विनय गुप्ता, संजय काळे, रविंद्र भैसे, दिनेश मिश्रा, शैलेश भगत यांना गौरविण्यात आले.गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनीही एका हत्येच्या गुन्ह्यात उत्कृष्ट तपास करून आरोपींना अटक केली. त्यामुळे ठाकरे यांच्यासह एपीआय गणेश पवार, अरुण कोडापे, शेखर गेडाम, अहेमद अली, महेंद्र येवतीकर, देवेंद्र कोठेकर यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अंबिकाप्रसाद यादव, विशेष शाखेचे भारत, आस्थापनाचे प्रमुख लिपिक किशोर शेंडे, कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पीएसआय नरेंश मुंडे, अब्दुल कलाम, गजू ढेवले, सागर ठाकरे, विशेष शाखेचे संजय गुरमाळे, जयराज आनकर, महिला पोलीस स्वाती, दर्शना, वाचक शाखेचे एपीआय कुकडे, एएसआय मांगलेकर, शैलेश अर्डक, सीसीटीएनएसच्या पीएसआय वैशाली आठवले, पोलीस शिपाई निखिल माहुरे, अंभीयंता अमित देशमुख यांना विविध कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाचा सीपींद्वारा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 11:36 PM
पोलीस विभागात सतत पंधरा वर्षे उत्कृष्ट सेवा देणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार घेण्यात आला.
ठळक मुद्देमहाराष्ट्रदिनी गौरव : पोलीस आयुक्तालयात कार्यक्रम