नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी गावांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात टँकर लावायला सुरुवात झाली आहे, किमान २० पेक्षा अधिक पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई दरवर्षी भासते. त्यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर, पाण्याची पातळी खालावल्याने हातपंपाच्या घशाला कोरड पडली आहे. भ्रष्टाचाराची कीड लागल्याने आदिवासींना शुद्ध पाणी पिण्यासाठी असले, तरी त्या पांढरा हत्ती ठरल्या आहे.
दरवर्षी मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगरदऱ्यात उंच-सखल भागावर असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पावसाळा संपताच नदी-नाले कोरडे पडतात. हातपंप निकामी होतात. पाण्यासाठी आदिवासींना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. फेब्रुवारीपासूनच अनेक गावांमध्ये पेयजलाची भीषण टंचाई जाणवते. कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठ्याची योजना तयार करूनही बदलल्या नाहीत.
एकच युनिट कुठे कधी जाणार?राज्य सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला तालुका असल्याने हातपंप दुरुस्त करणारे एकच युनिट गेल्या अनेक वर्षांपासून आहे. २० वर्षांपासून दुसऱ्या युनिटची मागणी कागदावर आहे.
नंदनवनाचे नशीबच खराबविदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन नावालाच उरले आहे. योजनाचा दुष्काळ येथे सुरू आहे. कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरला आहे. महिन्याभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने पर्यटक कसे येणार, हा व्यवसाय पुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना कशासाठी?मेळघाटात जलजीवन मिशन, घर घर पाणी योजनेला प्रमाणात त्यात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पावसाळ्यात अतिसाराची लागण झाली होती. आमसभेत थेट उपविभागीय अभियंता पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. पाणीटंचाईला हा विभागसुद्धा जबाबदार आहे.
पाच गावांत टँकर, अनेक प्रतीक्षेततालुक्यातील पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे तर अनेक गावे आता प्रतीक्षेत आहे. टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये आकी, खडीमल, मोथा, तारुबांदा, लवादा या गावांचा समावेश आहे.