लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट रुग्ण उपचारार्थ दाखल असून, मनुष्यबळाअभावी कर्तव्यावरील स्टाफसह रुग्णांची परवड होत आहे. गुरुवारी येथील मेडिकल वार्डांत ही स्थिती दिसून आली.जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मितीच ब्रिटिशकालीन असून, आहे त्याच जागेत, त्याच स्थितीत तोकड्या मनुष्यबळाच्या भरवशावर रुग्णसेवा सुरू आहे. सध्या उन्ह, वारा, पावसाच्या मिश्र वातावरणात तापमानातील अचानक बदल व दूषित पाण्यामुळे प्रकृतीत बिघाड होण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे.सामान्य रुग्णांना खासगीत उपचार करणे अशक्यप्राय असल्याने ते शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. परंतु तेथील सीमित वार्डांसह अल्प खाटांमुळे व तोकडा मनुष्यबळ असल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळू शकत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. सध्या मेडिकल उपचारार्थ वार्ड क्रमांक १, २ व ११ मध्ये शेकडो स्त्री रुग्ण, वार्ड क्रमांक ६, ८, १० मध्ये पुरुष रुग्ण दाखल आहेत. तेथील खाटांची संख्या मर्यादित असताना एका वार्डात दुप्पट - तिप्पट रुग्णांना औषधोपचार करण्यात येत आहे. यात अल्कोहोलिक व गॅस्ट्रोचे रुग्ण अधिक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. वार्ड क्रमांक १० मध्ये १९ खाट असताना ५० रुग्ण दाखल होते. याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी तेथील रुग्णांचे नातेवाईक चेतन देशमुख यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.रुग्णालयात एजंटांचा सुळसुळाटजिल्हा सामान्य रुग्णालयात दूरदुरून उपचारार्थ रुग्ण येतात. त्यामुळे येथील माहिती नसल्याने ते सहज विचारपूस करतात. तोच क्षण हेरून तेथे चुप्पी साधून बसलेले एजंट त्यांना हेरतात. काय हवे, कशासाठी आलेत, अशी विचारणा करून तुमचे काम करून देतो, असे म्हणून संबंधितांकडून पैसे उकळतात. यातील काही पैसे घेऊन पसार होतात. ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क केला असता ते मुंबई व आरएमओ प्रशांत घोडाम मिटिंगनिमित्त अकोला येथे गेल्याचे समजले.
रुग्णालये हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:03 PM
जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट रुग्ण उपचारार्थ दाखल असून, मनुष्यबळाअभावी कर्तव्यावरील स्टाफसह रुग्णांची परवड होत आहे. गुरुवारी येथील मेडिकल वार्डांत ही स्थिती दिसून आली.
ठळक मुद्देखाटांच्या तुलनेत रुग्ण दुप्पट : जिल्हा सामान्य रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव