शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रुग्णालयांकडे औषध, इंजेक्शन वापराबाबत रेकॉर्ड आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:11 AM

पान ३ साठी अमरावती : रेमडेसिविर व इतर शेड्यूल्ड ड्रग्जच्या वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे तसेच त्याच्या ...

पान ३ साठी

अमरावती : रेमडेसिविर व इतर शेड्यूल्ड ड्रग्जच्या वापराबाबत रुग्णालयांनीही त्यांच्या स्तरावर संनियंत्रण केले पाहिजे तसेच त्याच्या वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी येथे दिले.

जिल्हा प्रशासन व अमरावती महापालिकेमार्फत कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकरमायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा बचत भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर यावेळी उपस्थित होते. नवाल म्हणाले की, रेमडेसिविर व इतर शेड्यूल्ड ड्रग्ज वापराबाबत रुग्णालयांचे संनियंत्रण असावे. वापराबाबत संपूर्ण अभिलेख अद्ययावत असला पाहिजे. कुठल्या रुग्णाला इंजेक्शन दिले, त्याचे नाव, पत्ता, इंजेक्शनचा बॅच क्रमांक यांच्या नोंदी ठेवाव्यात. रिकाम्या व्हायलवर त्या कुठल्या रुग्णासाठी वापरल्या, त्याचे नाव नोंदवून सुरक्षित ठेवाव्यात. दर आठवड्याला याबाबतचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला सादर करावा.

प्रशासनाशी संपर्क साधा

कुठेही याप्रकारचे औषध, इंजेक्शन हवे असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी प्रशासन व रुग्णालयांचा व्हाॅट्सॲप ग्रुपही सुरू केला आहे. त्यामुळे मागणी नोंदवताच वेळेत पुरवठा केला जाईल. मात्र, परस्पर रुग्णांना चिठ्ठी देऊन इतरत्र शोधायला पाठवू नये. काळाबाजाराला उत्तेजन मिळेल अशी कुठलीही कृती करू नये. गरज असेल तेव्हा माहिती द्या. तात्काळ औषध मिळवून दिले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बाॅक्स २

तीन रुग्णालयांना नोटीस

तीन रुग्णालयांनी रेकॉर्ड न ठेवणे तसेच विहित दरापेक्षा अधिक दर आकारल्याचे आढळल्याने नोटीस बजावण्यात आली. असे पुन्हा घडता कामा नये. रुग्णांची आर्थिक पिळवणूक होता कामा नये. प्रत्येक बाबीचा वस्तुनिष्ठ रेकॉर्ड रुग्णालयात उपलब्ध असावा. आवश्यकता असल्यास डेटा अपडेशनसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी. मात्र, सर्व तपशील अचूक असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.