फोटो पी २३ अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्र कोरोना संसर्गाचे ठिकाण तर ठरणार नाही ना? अशी भीती तेथील गर्दी पाहता व्यक्त होत आहे. दुसऱ्या डोजसाठी महिला पुरुषांची एकच गर्दी झाल्याने तेथील व्यवस्था कोलमडली आहे.
ज्यांनी पहिला डोज घेतला त्यांच्यासाठी दुसऱ्या डोजची व्यवस्था करण्यात आल्याची सूचना नागरिकांना दिल्या गेली. त्यानुसार दुसरा डोज घेण्यासाठी नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपासून एकच गर्दी केली. ग्रामीण रुग्णालयाकडून त्या नागरिकांसाठी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय हे कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.