लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेंतर्गत सर्व घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. त्यानुसार मंगळवार २३ आॅक्टोबर रोजी १४ तालुक्यांत जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ७ हजार कुटुंबांच्या गृहभेटी घेण्यात आल्या आहेत.पहिला हप्त्याची उचल करूनही घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या मागील तीन वर्षांतील ७ हजार ३०० लाभार्थ्यांच्या भेट घेऊन घरकुलांची कामे सुरू केली आहेत. या उपक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्यकार्यपालन अधिकारी विनय ठमके, प्रकल्प संचालक आनंद भंडारी, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, प्रशांत थोरात, माया वानखडे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, प्रशांत गावंडे, राजेश सावळकर, कॅफो रवींद्र येवले, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी विजय राहाटे, समाज कल्याण अधिकारी चेतन जाधव व बीडीओंनी एकाच दिवशी १२ तालुक्यांत गृहभेटी दिल्या आहेत. अमरावती व भातकुली तालुक्यात बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी हा उपक्रम राबविला जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्की घरे बांधून घेण्याची ही संधी होती. मात्र, यातील सन २०१६-१७ मधील ४७ लाभार्थ्यांनी कामे सुरू केलेली नाहीत. या लाभार्थ्यांना आता या मोहिमेत घरकुल बांधकामासाठी शेवटची संधी दिली जाईल. या गृहभेटी देऊन घरकुलाचे कामे सुरू करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ही कामे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना या मोहिमेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.घरकुल मंजूर झाल्यानंतर जिल्हाभरातील ७ हजारांवर लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची उचल केली. मात्र बांधकाम सुरू केले नाहीत. अशा सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून घेण्यात आल्या आहेत. यात बऱ्याच ठिकाणी कामे सुरू झालेले दिसून आले.- मनीषा खत्री,मुख्यकार्यकारी अधिकारी
सात हजार कुटुंबांच्या गृहभेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:37 PM
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेंतर्गत सर्व घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत.
ठळक मुद्देआवास योजना : अधिकारी-पदाधिकारी पोहोचले गावोगावी