शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

दहा लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त कर्नाटकातून अमरावतीत आला कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:00 AM

अन्न व औषधी प्रशासनाची कार्यवाही : ३५०० किलो खवा ताब्यात; नमुने प्रयोगशाळेत

मनीष तसरे अमरावती : सणासुदीच्या काळात लोकमत न्यूज नेटवर्क खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन अधिक सतर्कतेने याकडे लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर कर्नाटकातून अमरावतीत आलेला ३५०० किलो भेसळयुक्त खवा ज्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये आहे. तो अन्न व औषधी प्रशासनाने छापा टाकून जप्त केला. 

अन्न व औषधी प्रशासन या प्रकरणी कारवाई करत असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कर्नाटक व गुजरात राज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध व भेसळयुक्त अन्नपदार्थ शहरात पोहोचल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना मिळताच गुरुवारी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील जुना बायपास मार्गावरील भागातील चैतन्य कॉलनीतील दिनेश रामराव नागपुरे यांच्या गोदामावर छापा टाकून सहआयुक्त रामभाऊ चौव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी, जिल्हा दुग्ध विभागाचे विनोद पाठक, पशुधन विकास अधिकारी तुषार गावंडे, तसेच फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भेसळयुक्त मिठाईची सातत्याने तपासणी करून पदार्थांबाबत अन्न प्रशासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येते. तरी नागरिकांनी मिठाई खरेदी करताना काळजी बाळगावी. तक्रार असल्यास तत्काळ अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न प्रशासनाने प्रभारी सहआयुक्त रामभाऊ चौव्हान यांनी केले. 

कर्नाटकातून थेट अमरावतीत नकली खवा सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरील राज्यांतून भेसळ पदार्थ अमरावतीत पोहोचविण्याकरिता विक्रेते नवनवीन शक्कल लढवितात. मागील वर्षी खासगी बसद्वारे शहरात येणारा खवा पकडला गेल्याचे पाहून यावर्षी विक्रेत्यांनी थेट गोडावूनपर्यंत चारचाकीने खवा मागविला.

"अमरावतीत भेसळयुक्त खवा पोहोचल्याची माहिती गुरुवारी सकाळीच मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून जुना बायपास मार्गावरील माणिकर्णानगरात। दिनेश नागपुरे यांच्या गोदामावर छापा टाकला. तेथे ३५०० किलो बनावट खवा कर्नाटक राज्यातून अमरावतीत विक्री करण्याकरिता आणलेला आढळून आला. या खव्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले."- गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती