लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर, ग्रह-तारे हवेत असे फिरतात कसे, ते छोटे का दिसतात, गोल फिरणारे वाऱ्याचे वादळ काय आहे, ते कसे फिरतात, अशा एक ना अनेक प्रश्नांचे भडीमार चिमुकल्यांनी खगोलीय अभ्यासकांना केले. शनिवारी रात्री बसस्थानक मार्गावरील व्यापारी संकुलावर टेलीस्कोपद्वारे चंद्र निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लहान्यांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनीच जवळून चंद्रदर्शनाचा आनंद घेतला.मराठी विज्ञान परिषद, रोटरी क्लॅब आॅफ अमरावती व स्टारगेझर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १२ इंच दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला चिमुकले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले. रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत उपस्थितांनी आकाश दर्शनाचा लाभ घेतला. आकाशातील चंद्राचे दुर्बिणीद्वारे जवळून निरीक्षण केले. यावेळी खगोल प्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, विजय गिरुळकर, समीर केडीया व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आकाश निरीक्षणावेळी चिमुकल्यांनी प्रवीण गुल्हाने यांच्या अवतीभवती घेराव करून प्रश्नांचे भडीमार केले. ग्रह-ताऱ्याविषयी जिज्ञासू वृत्तीच्या चिमुकल्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास गुल्हाने व गिरुळकर यांनी पुढाकार घेतला होता. ग्रह-तारे हवेत कसे फिरतात, ते कीती मोठे आहे, वादळ कसे तयार होते. ते गोल का फिरते, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे खगोलीय अभ्यासकांनी चिमुकल्यांना दिली. या कार्यक्रमातून चिमुकल्यांमधील ग्रह-ताºयाविषयीची जिज्ञासू वृत्ती दिसून आली.
सर, ग्रह-तारे फिरतात कसे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:12 PM
सर, ग्रह-तारे हवेत असे फिरतात कसे, ते छोटे का दिसतात, गोल फिरणारे वाऱ्याचे वादळ काय आहे, ते कसे फिरतात, अशा एक ना अनेक प्रश्नांचे भडीमार चिमुकल्यांनी खगोलीय अभ्यासकांना केले. शनिवारी रात्री बसस्थानक मार्गावरील व्यापारी संकुलावर टेलीस्कोपद्वारे चंद्र निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लहान्यांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनीच जवळून चंद्रदर्शनाचा आनंद घेतला.
ठळक मुद्देचिमुकल्यांचे प्रश्नांचा भडिमार : चंद्र निरीक्षणासाठी जिज्ञासूंची गर्दी