कामगार कार्यालयाच्या माहितीनूसार जिल्ह्यात घरोघरी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मोलकरीन या वर्गाची संख्या २० हजारांवर असली तरी प्रत्यक्षात १० हजारांपर्यंत महिलांची यापूर्वी नोंदणी झालेली आहे. मात्र, यापैकी २६०० महिलांनीच नूतनीकरण केले. आता तर नव्या सदस्यांनी नोंदणी करण्याची प्रक्रिया सात वर्षापासून बंद आहे. त्यामुळे शासनाने नोंदणीकृत ही अट वगळून घरेलू महिला कामगार मंडळाकडे असलेल्या यादीनुसार सरसकट लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग असल्यामुळे मोलकरीण महिलांना बहुतेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे या कुटुंबासमोर रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कुठलीही अट न ठेवता सरसकट सर्व मोलकरणी महिलांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी आहे.
बॉक्स
संत जनाबाई योजना कागदावरच
राज्य शासनाचे वतीने संत जनाबाई योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी अद्याप नोंदणी सुरू झाली नसल्याने कामगार कार्यालयाने सांगितले तसेच या कार्यालयाला या योजनेविषयी शासनाद्वारा कुठलेच पत्र प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले. या योजनेविषयी महिलांना अधिक माहिती नसल्याने शासनाने याविषयीची जनजागृती करण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
सात वर्षांपासून नोंदणीच नाही
घरेलू कामगार मंडळांद्वारे सात वर्षांपूर्वी १० हजारांपर्यंत महिला कामगारांची नोंदणी झालेली होती. त्यानंतर ही प्रक्रिया बंदच आहे त्यानंतर ज्यांनी नोंदणी केली, त्यांचे नूतनीकरणही झालेले नाही. त्यामुळे या कष्टकरी वर्गातील हजारो महिला या पॅकेजपासून वंचित राहणार, अशी स्थिती आहे. नूतनीकरण झालेल्या महिलांची संख्या प्रत्यक्ष महिलांच्या तुलनेत नगण्य आहे.
कोट
आमच्या संघटनेच्या ७० हजार महिला आहेत, मात्र, सात वर्षांपासून नोंदणीच बंद असल्याने नोंदणी व नूतनीकरण करता आलेले नाही. यापूर्वी नोंदणी असलेल्या सर्वच मोलकरणींना शासनाने पॅकेजचा लाभ द्यावा.
जे.एम. कोठारी, अध्यक्ष, घरेलू मोलकरीण संघटना
--- मोलकरणींच्या प्रतिक्रिया----
कोट
दहा वर्षांपासून घरगुती काम करीत असले तरी नोंदणीविषयी आम्हाला माहिती नाही. याविषयी सांगितलेदेखील नाही. कोरोना संसर्गामुळे अनेक घरांचे काम बंद झाले आहे. त्यामुळे आम्हाला शासनाने अट न ठेवता मदत द्यावी.
- एक कामगार महिला
कोट
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मंडळ अन् कार्यालय असते व तिथे नोंदणी करावे लागते, याची माहिती नाही. आता विचारायला गेले, तर नोंदणी काही वर्षांपासून बंद असल्याचे सांगण्यात आले. वर्षभरापासून हाताला काम नाही.
- घरेलू कामगार महिला
पाईंटर
नोंदणीकृत मोलकरणींची संख्या : १०,०००
नूतनीकरण केलेल्यांची संख्या : २,६००