गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे. अद्याप जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. येत्या २४ तासांत हे आॅनलाईन अर्ज कसे भरणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे योजनेला किमान १५ दिवस मुदतवाढ देणे अपरिहार्य आहे. जगाचा पोशिंदा रात्रंदिवस रांगेत उभा असल्याने या योजनेत सन्मान कुठे, हा तर बळीराजाचा अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत तर २० ते २५ हजार शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख ९२ हजार २०९ शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात एक लाख ४२ हजार ६८५ शेतकºयांनी बुधवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. गुरूवारी अधिकाधिक नोंदणी होऊन आॅनलाईन अर्ज भरले गेले तरी अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे १५ तारखेपर्यंत म्हणजेच केवळ २४ तासांत किमान ६० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरणे, ही अशक्यप्राय बाब आहे.सन्मान कुठे... हा तर अवमानचछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बळीराजा पत्नीसह रात्रंदिवस लाईनमध्ये उभा आहे. सेतू, संग्राम, महा- ई -सेवा केंद्र यांसह सीएससी केंद्रात गेल्यानंतर सर्व्हर डाऊन, अंगठा घेणारे डिव्हाईस कनेक्ट न होणे, यांसह अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. कर्जमाफीची माहिती बँका नीटपणे देत नाही. केंद्रचालकांचे सहकार्य नाही, शेतकºयांकडून अधिकचे पैसे उकळणे, याप्रकारामध्ये शेतकºयांचा सन्मान नव्हे तर ्अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.तीन दिवसांपासूनचे भारनियमन उठले ‘आॅनलाईन’च्या मुळावरजिल्ह्यासह राज्यात चार दिवसांपासून सक्तीचे भारनियमन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महा -ई-सेवा केंद्र कित्येक तास बंद राहते. याचा थेट फटका शेतकºयांना बसतो. या केंद्रावर त्यांना पत्नीसह ताटकळत बसावे लागत आहे. कर्जमाफीच्या आॅनलार्ईन प्रक्रियेत हे नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.अंगठा संलग्नित होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारीकर्जमाफी प्रक्रियेत शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.ज्यांचे आधार लिंकिंग नाही, अशा शेतकºयांना पत्नीसह स्वत:चा अंगठा देवून बायोमेट्रिकओळख पटवावी लागते. मात्र, या प्रक्रियेत त्यांचा अंगठा संलग्नित (मॅच) होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. किमान अशा अपवादात्मक स्थितीत तरी शेतकºयांचे अर्ज शेवटच्या दिवशी तरी आॅफलाईन पद्धतीने स्वीकारल्यास शेतकºयांना आधार ओळख नसल्यास शासनाचा आधार मिळेल.
२४ तासांत कसे भरणार ६० हजार अर्ज ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 9:48 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे.
ठळक मुद्देमुदतवाढ हवीच : जगाचा पोशिंदा अर्जासाठी रात्रंदिवस रांगेत