लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सत्र न्यायालयासमोरील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाने तक्रार दिल्याने महापालिकेचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे, निर्भिडपणे कारवाई कशी करणार, असा कर्मचाºयांचा सवाल आहे. त्याचा थेट परिणाम महापलिकेच्या कामकाजावर होणार आहे. जे अतिक्रमण काढताना कुत्तरमारेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते अतिक्रमण मात्र आजही जैसे थेच आहे.जिल्हा सत्र न्यायालय व जिल्हा परिषदेला लागून अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे. या अतिक्रमणावर अनेकदा कारवाई करण्यात आली. यावेळी २५ जानेवारीला अतिक्रमण विभागाने कारवार्ई केली. ज्यावेळी कारवार्ई सुरू होती, त्यावेळी कुत्तरमारे हे विभागीय आयुक्त कार्यालयात एका बैठकीला उपस्थित होते. नंतर ते घटनास्थळी आलेत. या अतिक्रमणावर कारवाई दरम्यानची क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्यात. त्यानंतर तक्रारकर्त्यांने कुत्तरमारे यांच्यावर जातीवाचक शिविगाळ केल्याने त्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली व आंदोलनही केले. यासर्व प्रकारात पोलिसांनी दबावात येऊन कुत्तरमारे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आता होत आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.अतिक्रमण काढण्याची कारवाई करतेवेळी हे अतिक्रमण कोणाचे, जात-पात, धर्म कोणता याची कुठलीही माहिती अधिकाºयांना नसते. या कारवाई दरम्यानची वस्तुस्थिती त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने आदिवासी, पारधी विकास परिषदेचे अध्यक्षांच्या पत्रपरिषदेत विशद केली असता, यावर खुद्द आयोजकांनी यावर सारवासारव केली. त्यामुळे कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हा ही फिल्डवर कामे करणाºया अधिकाºयांचे मनोधैर्य खच्ची करणारी बाब ठरली आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाºयांनी याबाबत रोष व्यक्त करीत महापालिकेचे कामकाज बंद पाडले. महापौरांसह आयुक्तांनी याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कुत्तरमारे आता रजेवर गेले. आता पुरता अतिक्रमण विभागच कोमात गेला आहे. अशातच न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. याचा महापालिकेच्या दैंनदिन कामकाजावर मोठा परिणाम होईल, हे वास्तव आहे.कामकाजावरच अनिष्ट परिणामकुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्ह्यानंतर कोणताही अधिकारी प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करण्यास धजावणार नाही किंवा निर्भिडपणे काम करणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. कुत्तरमारे यांच्या पाठीशी कर्मचारी भक्कमपणे उभे राहिले. अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची करणाºया या प्रकारानंतर महापालिकेचे पदाधिकारीदेखील चुप्पी साधून आहेत. अधिकाºयांवर दडपण आणून काम करून घेणाºया पदाधिकाºयांनी या प्रकरणामध्ये कोणाशी संवाद साधला, काय सहकार्य केले. याबाबत नकारघंटाच आहे. या सर्व प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करणाºया अधिकाºयांच्या पाठीशी कोण, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महापालिका अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:07 PM
जिल्हा सत्र न्यायालयासमोरील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाने तक्रार दिल्याने महापालिकेचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे, निर्भिडपणे कारवाई कशी करणार, असा कर्मचाºयांचा सवाल आहे. त्याचा थेट परिणाम महापलिकेच्या कामकाजावर होणार आहे. जे अतिक्रमण काढताना कुत्तरमारेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते अतिक्रमण मात्र आजही जैसे थेच आहे.
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे मौन : अतिक्रमण जैसे थै, कुत्तरमारेंवर अॅट्रॉसिटी