शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
2
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ
3
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप
4
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट
5
समृद्धीवरील टोलचे कंपनीचे कंत्राट रद्द? नियमांचे उल्लंघन; एमएसआरडीसीकडून नोटीस जारी
6
"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, सुखद बातमी मिळण्याची शक्यता
8
मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय
9
सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 
10
नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 
11
जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा
12
ईशा फाउंडेशन प्रकरणी पोलिस चौकशीस स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
13
स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना
14
राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
15
‘माझी ड्यूटी संपली, मी विमान उडवणार नाही’; पुण्याहून जाणारे विमान ५ तास लटकले
16
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत
17
मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
19
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

आता जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २६ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:09 AM

अमरावती : बदलत्या जीवनशैलीनुसार घरगुती गॅस सिलिंडर आता सर्वांची गरज बनली आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीत रोजगार गेला. अनेकांचा गाठीशी ...

अमरावती : बदलत्या जीवनशैलीनुसार घरगुती गॅस सिलिंडर आता सर्वांची गरज बनली आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीत रोजगार गेला. अनेकांचा गाठीशी असलेला पैसा खर्च झाला. अशातच महागाईनेही तोंड वर काढले आहे. नियमित वापरातील घरगुती सिलिंडरचे दरही दर महिन्यात उसळी घेत आहे. जुलै महिन्याच्या १ तारखेलाच थेट २६ रुपयांनी उसळी घेतल्याने ग्राहकांना ८५९.५० रुपये, तर १६८२.५० रुपयांत व्यावसायिक सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. मात्र, मिळणारे सिलिंडर अनुदान ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारे ठरत आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्या ०० घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक असून, ००० एजन्सीधारकांकडून त्यांना नियमित सिलिंडर पुरवठा केला जातो. वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता राहिल्याने या काळात सिलिंडरच्या दराचाही भडका उडाला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ०० रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे आता नाईलाजास्तव महागडे सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. कोट

कोरोनाच्या महामारीत महागाईचाही भडका उडाला आहे. त्यामुळे घरखर्च करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. जानेवारीपासून सातत्याने सिलिंडरची दरवाढ होत आहे. या सिलिंडरवर मिळणारी सबसिडीदेखील आता नाममात्र मिळत आहे. त्यामुळे आर्थिक बजेट बिघडले आहे. पण, त्याच्याशिवाय भागत नसल्याने पदरमोड करून त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

- कांताबाई रामेश्वर चव्हाण, गृहिणी, कारला

---

ग्रामीण भागात पावसाळ्यात चुलीवर स्वयंपाक करणे म्हणजे कसरतच आहे. त्यामुळे गॅस योजनेतून मिळालेल्या गॅसचा महिला वर्गाला मोठा आधार होता. आता सिलिंडरचे दर गगणाला भिडल्यामुळे नियमित गॅसचा वापर करणे अशक्य झाले आहे. पुन्हा चूल पेटविण्याची वेळ या महागाईमुळे महिलांवर आली आहे.

- ज्योती राठोड,

गृहिणी, लालखेड

बॉक्स

गावात पुन्हा चुली पेटल्या

गावात पूर्वीपासून चुलीवरच स्वयंपाक होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तसेच धुरामुळे महिलांना डोळ्यासह श्वसनाचे आजार जडत आहे. वृक्षतोड थांबविण्यासोबतच महिलांच्या आरोग्याचा विचार करून घरोघरी गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावे म्हणून पंतप्रधान उज्ज्वलागॅस योजना केंद्र शासनाने सुरू केली. याद्वारे शेगडी व सिलिंडर ग्रामीण कुटुंबीयांना मोफत दिले गेले. परंतु आता रोजमजुरी करणाऱ्यांना ८७० रुपये देऊन सिलिंडर खरेदी करणे पवडणारे नाही. म्हणून त्यांनी गॅस बंद करून पुन्हा चूल पेटविली आहे. अत्यावश्यक बाब म्हणूनच आता गॅसचा वापर केला जात आहे. त्यामुळे वृक्षतोडीकडे नागरिकांची वाटचाल सुरू झाली आहे.

--

मार्च महिन्यत झाली उच्चांकी वाढ

जानेवारी महिन्यात ७१९ रुपयांमध्ये मिळणारे घरगुती सिलिंडर जुलै महिन्यात तब्बल ८६० रुपयांमध्ये घ्यावे लागत आहे. सर्वाधिक घरगुती सिलिंडरची दरवाढ फेब्रुवारी महिन्यात झाली. ४ फेब्रुवारीला ७१९ रुपये दर झाले. त्यानंतर लगेच १५ फेब्रुवारीला ७४४ आणि २५ फेब्रुवारीला ७९४ रुपयांनी वाढ झाली. या एकाच महिन्यात ७५ रुपयांनी वाढ नोंदविली गेली.

बॉक्स

महिना घरगुती व्यावसायिक

ऑगस्ट ६१८.५० १२०१.५०

सप्टेंबर ६११९ ११९९

ऑक्टोबर ६१९ १२२४

नोव्हेंबर ६१९ १३००

डिसेंबर ७१९ १३९१

जानेवारी ७१९ १४०८

फेब्रुवारी ७९४ १५९८.५०

मार्च ८४४ १६७४

एप्रिल ८३४ १७१२

मे ८३४ १६६६.५०

जून ८३४ १५४४

जुलै ८५९.५० १६८२.५०