गुपित रघुवीरचे : मिठाई शुद्धतेच्या तपासणीची मोहीम केव्हा?अमरावती : रघुवीरच्या मिठाईनिर्मितीसाठी वापरला जाणारा खवा सातत्याने तपासला जावा ही दुग्धजन्य पदार्थांसबंधीच्या तज्ज्ञांनी केलेली आग्रही सूचना ज्या मुद्यांच्या आधारावर आहे, ते मुद्दे विचारात घेतले तर मिठाई २४ कॅरेट शुद्ध आहे काय, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. अमरावती जिल्ह्यात येणारे दूध सहसा ग्रामीण भागातून येते. शहरातील दूध उत्पादन नगण्य असेच आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या दूध उत्पादनापैकी मेळघाट भागातील दूध उत्पदन केवळ नैसर्गिक चाऱ्याच्या भरवशावर अवलंबून आहे. अर्थात मेळघाट परीसरात ज्या म्हशी किंवा गाई आहेत, त्यांना अधिक दूध देण्यासाठी दिला जाणारा अलप, ढेप देण्याची क्षमता मेळघाटातील पशुपालकांत नाही. पशुवैद्यक शास्त्र असे सांगते की, दुग्धजन्य पशुंना आवश्यक खाद्य न मिळाल्यास दूध निर्मितीसाठीची प्रक्रिया शतप्रतिशत रिझल्टस देत नाही. पशुंना खाण्यासाठी केवळ हिरवा चारा किंवा गवत असेल तर त्यांच्या दुधात फॅटचे प्रमाण हवे तितके निर्माण होत नाही. मेळघाटातील दुधात फॅटचे प्रमाण त्यामुळे अल्प प्रमाणात आहे. गवत आणि क्षार यावरच मेळघटातील दुग्धजन्य पशुंची उपजिविका चालते. दुसरे असे की मेळघाटात निर्माण होणारे दूध पेळ्यापर्यंत बऱ्यापैकी प्उपलब्ध होते. त्यानंतर तेथील कष्टकरी वर्ग कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होत असल्यामुळे पशुपालन आणि दुधविक्रीच्या व्यवसायाकडे ते पाठ फिरवितात. मेळघाटातील दूध देणाऱ्या पशुंबाबत 'लोकमत'ने तज्ज्ञांकडून मिळविलेली माहिती येथे विस्ताराने देण्याचे कारण इतक्याचसाठी की, परतवाडा आणि मेळघाटातील दुधाच्या भरवशावर आमच्या मिठाईची निर्मिती होते, असा दावा रघुवीरने केला आहे. परतवाड्यात दुधाचे उल्लेखनीय उत्पादन नाही आणि मेळघाटात उत्पादित होणाऱ्या दुधात फॅटचा अभाव असल्यामुळे त्याचा मिठाईलायक खवा तयार होणे शक्य नाही. शास्त्रोक्त स्थिती अशी असताना शेकडो, हजारो किलो मिठाई तयार होते ती कशी, हा मुद्दा जसा बुद्धीला ताण देणारा आहे तसाच तो एफडीएने तपासपटलावर घ्यावा असाही आहेच.
‘फॅट’शिवाय खवा कसा ?
By admin | Published: October 05, 2016 12:13 AM